पोंभुर्णा: पोलीस स्टेशन पोंभुर्णा अंर्तगत मौजा सोनापुर येथील 27 वर्षीय विवाहित महिलेने तक्रार नोंदविली की, दि. 10/07/2023 रोजी 11:00 वाजता सुमारास आपल्या शेतात निंदनी करण्यासाठी गावातील इतर दोन महिलासोबत जावुन दुपारी 2:30 वा. सुमारास घरी परत येत असतांना तिचा चुलत दिर नामे धिरज ठेंगणे याचे घराजवळ आली तेंव्हा धिरज ठेंगणे तिचा हात पकडुन तिला जबरदस्तीने आपले गोठयाकडे नेवुन तिला 20,000/- रु दे नाहीतर तुझा रेप करतो म्हणुन तिचेशी जबरदस्ती करु लागल्याने फिर्यादीने घाबरुन तिला पैसे देण्याचे कबुल केले तेंव्हा आरोपीने तिला जर तु पैसे आणुन दिले नाही तर तुला व तुझ्या पोराला मारुन टाकतो म्हणुन फिर्यादीचा मोबाईल आपले जवळ ठेवला.Elderly mother stoned to death by cousins
तेंव्हा फिर्यादीने कशीबशी आपली सुटका करुन घरी आली व घरी हजर असलेली तिची सासु श्रीमती पुष्पाताई मधुकर ठेंगणे हिला धिरज रविंद्र ठेंगणे याने तिचे सोबत केलेल्या वरील घटनेबाबत सांगितले असता सासु पुष्पाताई ठेंगणे हिने मी आता त्याचेकडे जातो व त्यास जाब विचारून तुझा मोबाईल त्याचेकडुन मागुन आणतो म्हणुन गेली परंतु बराच वेळापर्यंत घरी परत न आल्याने फिर्यादीने तिचा पतीला दुसऱ्याचे मोबाईलने फोन करुन घरी बोलावुन सर्व हकिकत सांगितल्याने तिचा पती हा धिरज ठेंगणे याचे घराजवळ जावुन थोडयात वेळाने परत येवुन सांगितले की, आईचा धियने मर्डर केला, आईला खाताचे खडयात टाकुन आहे असे सांगितले वरुन फिर्यादी पुन्हा पती सोबत सदर ठिकाणी जावुन पाहिले असता सासु श्रीमती पुष्पाताई मधुकर ठेंगणे ही खाताचे खडयातील जमा असलेल्या पाण्यात मृतावस्थेत मिळुन आली. फिर्यादीचा चुलत दिर न धिरज रविंद्र ठेंगणे वय 20 वर्ष याने फिर्यादीची सासु श्रीमती पुष्पाताई मधुकर ठेंगणे हिला कोणत्यातरी दगडाने कपाळावर, नाका-तोंडावर मारुन तिचा खुन केला. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन पोंभुर्णा येथे आरोपीविरुध्द कलम 302, 354, 354 (ब), 329, 201, 506 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपी घटनेनंतर जंगलात फरार झाल्याने पो.स्टे. पोंभुर्णा येथील ठाणेदार सपोनि श्री मनोज गदादे व स्टॉफ, उपपोस्टे उमरी पोतदार येथील ठाणेदार सपोनि श्री किशोर शेरकी व स्टॉफ तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री महेश कोंडवार व स्टॉफ यांनी आरोपीचा कसोशीने शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले आहे.
गुन्हयाचे घटनास्थळ अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु तसेच श्री मल्लीकाअर्जुन इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुल यांनी भेट दिली असुन त्यांच्या आणि पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.
0 comments:
Post a Comment