Ads

आदर्श गाव असलेल्या चंदनखेडा ग्रामपंचायत मधेच ग्रामसेवकाच्या उपस्थिती जंगी दारू पार्टी

जावेद शेखभद्रावती तालुका प्रतिनिधी :- माजी खासदार व विद्यमान राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी दत्तक घेतलेले व आदर्श गाव असलेल्या चंदनखेडा ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक किशोर नाईकवार व इतर कर्मचारी यांची दारू पार्टी रंगली असल्याचा खळबळजनक विडियो समोर आला असून या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार देण्यात आल्याची माहिती आहे. liquor party in the presence of gram sevak in Chandankheda Gram Panchayat which is an ideal village
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा गाव हे लोकवस्तीने मोठे असून या गावात मोठे राजकारण चालत असते दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात तेवढे वैर नाही पण येथील ग्रामसेवक मात्र या संधीचा फायदा घेऊन जणू एकछत्री राज्य चालवतात की काय अशीच परिस्थिती आहे. दोन दिवसांपूर्वी यांचं ग्रामपंचायत काही क्रिकेट खेळणारे तरुण यांनी पाणी पिण्यासाठी ग्रामपंचायत मधे गेले असता तिथे दारूच्या दोन बोतल आढळून आल्या व ग्रामसेवक आता आपल्यावर आरोप होतोय म्हणून त्यांनी ग्रामपंचायत मधून पळ काढला. मात्र या सर्व घटनेचा तरुणांनी विडियो काढला असल्याने ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. आता ग्रामपंचायत च्या या भोंगळ कारभाराविरोधात ग्रामस्थ तरुण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याने ग्रामसेवक व इतर कर्मचारी यांच्यावर काय कारवाई होते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment