Ads

चार युवकांचा सेल्फी काढण्याच्या नादात घोडझरी तलावात बुडून मृत्यू

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील शेगाव येथील चार युवकांचा सेल्फी काढण्याच्या नादात घोडझरी तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार १६ जुलै चे सायंकाळी ४.३० वाजताची आहे.Four youths drowned in Ghodzari lake while taking selfies
मृतकांमध्ये मनीष श्रीरामे (२६), धीरज झाडें (२७), संकेत मोडक (२५), चेतन मांदाडे (१७) यांचा समावेश आहे. शेगाव येथील आठ युवक रविवारी पार्टीसाठी घोडझारी तलाव येथे आले होते. घोडाझरी तलाव परिसरात फिरल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात एक जण घसरून पडला त्याचे पाठोपाठ तीन जण पडले. सोबतच्या चार सहकाऱ्यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पावसामुळे घोडझरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे त्यांचा पत्ता लागला नाही. सध्या शोध सुरु असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment