Ads

काल पासून अडाण नदीत अडकलेल्या इसमास सुखरुप काढले बाहेर..

घाटंजी (तालुका प्रतिनिधी):-
तालुक्यातील कापशी कोपरी जवळून वाहत जात असलेल्या अडाण नदीत कोपरी येथिल भाऊराव सातघरे वय अं.५८ वर्ष हे काल दिनांक १५ जुलै शनिवारला अडाण नदीच्या पात्रातील इशोर जवळ मासे पकडण्यासाठी गेल्याचे समजते.अश्यातच अचानक नदीला पूर आल्याने ते नदीत अडकले.Man stuck in Adan river since yesterday was brought out safely..
खूप रात्र होवूनही भाऊराव सातघरे घरी न आल्याने घरच्या मंडळीची तारांबळ उडाली.त्यांनी अडाण नदी गाठली तोच भाऊराव सातघरे यांचे कपडे नदी काठावर दिसून आले.त्यांनी भाऊरावला आवाज देण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या प्रवाहाने त्यांना आवाज पोहचले नाही.तोच या मंडळींनी गाव गाठत त्यांनी पोलीस पाटील निलावार यांना घटनेची माहिती दिली.तोच त्यांनी घोटी महसूल मंडळ अधिकारी टापरे यांना माहिती दिली.त्यांनी घटनेची गांभीर्य ओळखून तहसीलदार यांना माहिती दिली.त्यांनी लगेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निवारणशी संपर्क करून प्राचारण केले.तोच त्यांनी घटना स्थळ गाठले.मात्र रात्रीची वेळ आणि नदीचा प्रवाह यात भाऊराव यांना रातआंधळे पणा असल्याने संपर्क होवू शकत नव्हता.बचाव पथकाची रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत शर्तीचे प्रयत्न चालू होते मात्र यश आले नाही.तोच आज रविवारला सकाळ होताच बचाव पथकाने आपल्या कार्यास सुरुवात केली.यात भाऊराव सातघरे उंच जागेचा आसरा घेत जीव मुठीत घेवून रात्र काढल्यानंतर बचाव पथकाच्या हाती लागले त्यांना बचाव पथकाने बोटीच्या साह्याने बाहेर काढले.आणि सर्वांचे जीव भांड्यात पडले.
"देव तारी त्याला कोण मारी" या म्हणी प्रमाणे भाऊराव सातघरे यांचे बाबतीत घडले.५८वर्षाचे सातघरे नदीवर पात्रात गेल्यानंतर अचानक नदीला पूर आल्याने मोठा धोका निर्माण झाला होता.ते घरी न परतल्याने घरच्या मंडळीची तारांबळ उडाली होती.अशातच त्यांना रातआंधळेपणा असल्याने रात्री दरम्यान काहीच दिसत नसल्याचे समजते असे असताना त्यांनी एका झाडाचा आधार घेवून रात्र काढली.यात त्यांचे भाग्य बळवंतर होते.कारण रात्री दरम्यान पावसाचा जोर वाढला असता तर पाण्याच्या पातळीत वाढ झाली असती यात ते वाहून गेले असते.मात्र पाणी पातळीत वाढ न झाल्याने त्यांना बोटीतून सुखरुप बाहेर काढण्यात आले व रामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.यात त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात येत आहे.या बचाव कार्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निवारण समितीचे प्रमुख मून, टीम प्रमुख भगत व त्यांचे पथक यांचेसह तहसीलदार मोहनीश शेलवटकर, मंडळ अधिकारी टापरे, पोलिस पाटील नीलावार,घोटी ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच तथा सेतू संचालक धनराज पवार उपस्थित राहून सहभागी झाले होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment