Ads

भद्रावती शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच, शहरात आणखी तीन ठिकाणी चोऱ्या.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :- crime newsभद्रावती शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून शहरात तीन ठिकाणी चोऱ्या करून अज्ञात चोरट्यांनी भद्रावती पोलिसांपुढे आव्हान निर्माण केले आहे. शहरात सतत होत असलेल्या चोरांच्या घटनेमुळे शहरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. Burglary session continues in Bhadravati city, burglary at three more places in the city.
शहरातील साईलान समोर राहणाऱ्या निखिल रमेश गुंडावार यांच्या घरातून कपाटात ठेवलेली 70 हजार रुपये चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. निखिल गुंडावर हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. परत आल्यानंतर त्यांना कपाटातील 70 हजार रुपये चोरीला गेल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे कपाटातील सोन्याचे दागिने सुरक्षित होते. सदर घटनेची तक्रार निखिल गुंडावर यांनी भद्रावती पोलिसात केली आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी शहरातील किल्ला वार्ड येथे राहत असलेल्या सुनील राचलवार यांच्या घरातून एक लक्ष रुपयाची चोरी झाली. त्यांनी सुद्धा सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल केली आहे. याच दरम्यान भद्रावती येथील सुप्रसिद्ध व्यापारी मुरलीधर अग्रवाल हे पुण्याला गेले असताना त्यांच्या घरात चोरी झाली. या घटनेत अग्रवाल यांच्या घरातून जवळपास 30 ते 40 हजाराची रोख रक्कम चोरीला गेली असल्याचे त्यांनी सांगितले.सदर घटनेची तक्रार भद्रावरती पोलिसात करण्यात आली असून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी अग्रवाल यांनी भद्रावती पोलिसांना केली आहे. शहरात चोरांच्या सत्रामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या चोरट्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षितता प्रदान करावी अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहे. अग्रवाल यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये अज्ञात चोरटे कैद झालेले आहेत.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment