Ads

भद्रावतीत दिवंगत खा.बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

तालुका प्रतिनिधी( भद्रावती)
जावेद शेख :- तालुका व शहर काँग्रेस भद्रावतीच्या वतीने चंद्रपूर- वनी- आणि लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रथम जयंती निमित्त शहरात दि 4 रोज मंगळवार ला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 109 रक्तदात्यांनी रक्तदान केले.Organized various programs on the occasion of Late MP. Balu Dhanorkar's birth anniversary in Bhadravati
यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर ,तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, शहराध्यक्ष सुरज गावंडे ,प्रफुल चटकी, चंद्रकांत खारकर ,माजी नगराध्यक्ष सरिता सूर, रेखा कुटेमाटे, जयश्री दातारकर ,प्रतिभा सोनटक्के, लीला ढुमणे, लक्ष्मी पारखी, विनोद वानखेडे आदींची उपस्थिती होती.
सकाळी 9.30 वाजता शहरातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले .त्यानंतर शहरातील घूटकाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 147 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले त्यानंतर शहरातील गरीब नागरिकांना पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता 236 मोठ्या आकाराच्या छत्र्यांचे वितरण करण्यात आले. रक्तदान शिबिराला चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चमृनी सहकार्य केले, यात डॉ. नितीन टिपले, अमोल रामटेके, अर्पणा रामटेके, सोनी मेश्राम, अभिलाष कुकडे, अक्षय जिद्देलवार, हर्षिता भारती, विजयालक्ष्मी बोबडे, रोशन पाटील आदींचा सहभाग होता.
दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व युवकांनी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. अलीकडच्या काळातील अपघातांचे प्रमाण पाहता रक्ताची आवश्यकता वाढलेली असून विशेषता तरुणांनी रक्तदानासाठी सदैव तत्पर असावे असे मत नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक प्रमोद नागोसे, प्रशांत झाडे, निखिल राऊत, सुधीर मुळेवार ,राजृ डोंगे, अशोक येरगुडे ,राकेश दोन्तावार, सुयोग धानोरकर, प्रतीक धानोरकर, अक्षय बोडे, चंदु दानव, प्रदीप घागी, महेश मोरे, नयन जांभुळे ,ईश्वर धांडे आदींनी मोलाचे सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment