Ads

आदर्श शाळेत गुरुपौर्णिमे निमित्य शिक्षकांचा भेटवस्तू देऊन नेफडो तर्फे केला सत्कार.

राजुरा :बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा या शाळेत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.Nefdo felicitated teachers with gifts on the occasion of Gurupurnima in Adarsh ​​School.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रजनी शर्मा, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विकास समिती, नेफडो, या होत्या. तर प्रमुख अतिथी म्ह्णून भास्करराव येसेकर, सचिव, बा. शी. प्र. मं., संतोष काकडे, वनरक्षक, सामाजिक वनिकरण विभाग कोरपना, संतोष देरकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, नेफडो, दिलीप सदावर्ते, चंद्रपूर जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी, अनंत डोंगे, कविता शर्मा, प्रदीप भावे, राजुरा तालुका संघटक, बबलू चव्हाण, महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष, स्वाती मेश्राम, आशिष करमरकर, चंद्रपूर जिल्हा युवा अध्यक्ष, नलिनी पिंगे, मुख्याध्यापिका, आदर्श प्राथमिक, सारिपूत्र जांभुळकर,मुख्याध्यापक, आदर्श हायस्कुल, आकाश वाटेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. सत्कारमूर्ती म्हणून त्रिवेणी गव्हारे, मराठी विषयात यूजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण केली असून तिला केंद्र सरकारची राष्ट्रीय ज्युनिअर रिसर्च फेलोशिप प्राप्त झाली आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथून मानसशास्त्र व मराठी विषयात पदवी तर शिक्षण प्राप्त केल्यानंतर यूजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण केली त्यानंतर तिला राष्ट्रीय रिसर्च फेलोशिप मिळाली त्रिवेणी ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे ती पुणे येथे विविध संस्थाद्वारे सामाजिक कार्यात अग्रेसर आहे तिच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाबद्दल नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने शॉल, श्रीफळ, पुस्तकं भेट देऊन सत्कार करण्यात आला.
आपल्या जीवनात गुरूंचे स्थान अविभाज्य असून त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे गुरूंची माहिती सांगणारा गुरुपौर्णिमा उत्सव आज मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतोय असे प्रतिपादन रजनी शर्मा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश चिडे यांनी केले. प्रास्ताविक स्वाती मेश्राम यांनी तर आभार ज्योती कल्लूरवार यांनी केले. यावेळी समृद्धी महामार्गात अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना मौन घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्रिवेणी गव्हारे चे प्राथमिक शिक्षण आदर्श मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत झाले. तिने शाळेला पुस्तकं भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली आणी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा देत उपस्थित विध्यार्थीना मार्गदर्शनही केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment