Ads

आयटक च्या नेतृत्वात आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांचा पावसात धडकला Z.P. वर छत्री मोर्चा,

चंद्रपूर :- AITUC आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने पावसाळी अधिवेशना निमित्त सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 26 जुलै रोजी मुंबई आझाद मैदान येथे आशा व गट प्रवर्तक यांना किमान वेतन लागू करा,शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या,पगारी रजा,दिवाळी बोनस,एप्रिल पासून चे राज्य सरकारचे थकीत मानधन मिळावे यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यव्यापी छत्री मोर्चा आयोजित केला होता .
Asha workers and group promoters under the leadership of AITUC marched in the rain at Z.P
त्या अनुसंघाने आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे, भाकप चे जिल्हा सचिव कॉ .नामदेव कनाके,राज्य कौन्सिल सदक्ष कॉ.रवींद्र उमाटे,सहसचिव कॉ.राजू गैनवार, कॉ.प्रकाश रेड्डी,निकीता नीर् जिल्हा सचिव यांच्या नेतृत्वात आशा व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांचा चंद्रपूर जिल्हा परिषद वर भर पावसात विशाल छत्री मोर्चा नारेबाजी करत धडक देत मणिपूर मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला सोबतच विविध मागण्यांचा निवेदन मा.मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले व विविध स्थानिक मागण्या बाबतीत चर्चा करण्यात आली.ज्यामधे शहरी व ग्रामीण आशा व गटप्रवर्तक यांचे वाढीव व थकित मानधन एप्रिल 2023 पासून देण्यात आले नाही त्यामुळे बहुतांश आशा व गटप्रवर्तक यांच्यावर उपास मारीची वेळ आली आहे. महाराष्ट्र शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे.
तसेच गेल्या १२ महिन्यांपासून आरोग्यवर्धिनी कामाचे phc चे गावी कामाचे पैसे मिळाले नाहीत ते मिळावे ,मोबाईल पुनर्भरण चे थकीत पैसे अद्यावत दराने मिळावेत सरकारने अँड्रॉइड मोबाईल देण्याचा परिपत्रक काढले त्याची अमल बजावणी व्हावी
सरकारने आशा वर्कर ला सायकल व गट प्रवर्तक यांना स्कूटी देण्याची घोषणा केली त्यानुसार सायकल आणि स्कूटी द्यावी
गट प्रवर्तक याना आशा सुपरवायझर हे नाव निश्चित करावे,आरोग्य खात्यातील रिक्त जागा भरताना आशा गट प्रवर्तक मधून ५०%जागा अनुभवाचे आधारे भरा, आशा ना किमान १८०००₹ गट प्रवर्तक याना २५०००₹ वेतन द्या ,21 जून 2023 च्या मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशप्रमाणे ग्राम पंचायत स्तरावर कोरोना विषयक काम करणाऱ्या आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना ग्राम निधी व वित्तनिधी मधून दरमहा हजार रुपये प्रोत्साहन भत्ता त्वरित अदा करण्यात यावा.वीणा विनामोबदला कामे सांगणे बंद करा यासह आदी मागण्या विशही चर्चा करण्यात आली.मागण्या न सोडविल्यास बेमुदत राज्यव्यापी संप करण्याचा इशारा कॉ.विनोद झोडगे यांनी दिला आहे.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी सुनंदा मुल मुले, शालू लांडे,सखू खोके ,विद्या जांभुळे,सविता गटलेवार,हेमलता नाकाडे,वनिता तिवाडे,कल्पना मिलमिले,नीलिमा थुल,सविता बोबडे,रेखा खोब्रागडे, मंदिरा देवतळे यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी जिल्हा भरातून हजारो आशा वर्कर व गट प्रवर्तक सहभागी झाले होते.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment