Ads

चंद्रपुरातील पूरस्थितीला मनपा, जिल्हाप्रशासनासह लोकप्रतिनिधी जबाबदार

चंद्रपूर : मागील दोन वर्षांपासून चंद्रपुरात सलग पूरस्थिती उद्भवत आहे. यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत असून, भविष्यातही अशा परिस्थितीला चंद्रपूरकरांना समोरे जावे लागणार आहे. महानगरपालिका, जिल्हाप्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची निष्क्रियता, विविध कामे आणि योजनेतील गैरप्रकार याला कारणीभूत असल्याचा आरोप हरविंदसिंह धुन्ना यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
People's representatives along with municipal council, district administration are responsible for the flood situation in Chandrapur
इरई नदीपात्रात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. तिच अवस्था झरपट नदीची असून, शहरातील काही मुख्य नाल्यावरही अतिक्रमण झाल्याने शहरात वारंवार पूरस्थिती उद्भवत आहे. इरई आणि झरपट या शहरातून वाहणाऱ्या दोन मुख्य नद्या आहेत. या नद्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करणे गरजेचे आहे. तसेच मच्छीनाल्यासह काही नाल्यांचेही रुंदीकरण करणे आवश्यक आहे. मात्र, मनपा, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शास्त्रीनगर येथून वाहणाऱ्या मच्छीनाल्यावर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे हा नाला आता नालीत रुपांतरीत झाला आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस झाल्यास पाण्याचा योग्य निचरा होत नाही. आणि नाल्याचे पाणी सकल भागातील घरामध्ये शिरून नागरिकांचे नुकसान होत आहे. इरई, झरपट नादीपात्रात झुडपे वाढली आहे. त्यामुळे झुडपे काढून रुंदीकरण आणि खोलीकरण होणे आवश्यक आहे. मविआ सरकारच्या काळात इरई नदीच्या विकासासाठी ५६२ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. ४४ कोटी प्रस्तावितही झाले. उर्वरित निधी जिल्हा खनिज विकास निधीतून खर्च करण्याची तरतूद करण्यात आली. मात्र, नंतर हे काम बारगळले आणि इरईचा प्रश्न कायम राहिला असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शहरातील रस्ते, नालीच्या बांधकामाचे चुकलेले नियोजन, नालीबांधकामातील झालेला भ्रष्टाचार यामुळेसुध्दा शहरातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप हरविंदरसिंग धुन्ना, ज्येष्ठ पत्रकार दाचेवार यांनी केला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment