Ads

महाराष्ट्रात ऑनलाईन गेम्स वर बंदी घाला

चंद्रपूर :- हल्ली मोबाईल, टॅब किंवा टीव्हीवर ऑनलाईन गेम्स खेळणं ही अनेकांची सवय झाली आहे. पण ही सवय आता व्यसनामध्ये परावर्तीत होऊ लागली आहे. त्यामुळे या गेमिंगवर नियंत्रण आणण्यासाठी ऑनलाईन गेम्स वर तामिडनाडू राज्याच्या धर्तीवर बंदी घालण्याची लोकहितकारी मागणी औचित्याच्या मुद्यावर बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सभागृहात सरकारला केली.
Ban online games in Maharashtra
एकेकाळी केवळ टाईमपास असलेलं ऑनलाईन गेमिंग आता अनेकांचे व्यसन आहे. आपल्या देशात ऑनलाईन गेमिंगची 'साथ' आली आहे. 24 तास तहान, भूक, झोप विसरून गेम खेळणारी तरूण पिढी तयार होत आहे. काही ऑनलाईन गेम्समध्ये पैसे कमावण्याची संधी असल्यामुळे जुगाराप्रमाणे त्यांचे व्यसन लागत आहे. सध्या राज्यात मोबाईल द्वारे अनेक ऑनलाईन गेम चा सुळसुळाट झाला आहे. या गेमद्वारे सर्रासपणे जुगार खेळाला जात असल्याचे निर्दशनास येत आहे. या जुगाराच्या विळख्यात तरुण पिढी तसेच लहान मुले सुध्दा गुंतलेली आहे. संपूर्ण पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर आहे. या संपूर्ण ऑनलाईन गेम्स वर बंदी आणण्यासाठी यासंदर्भात खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत प्रश्न देखील उपस्थीत केला होता. अलीकडेच काही दिवसा आधी चंद्रपूर येथील देवाडा गावातील युवकाने ऑनलाईन रम्मी या खेळाच्या नादातून पत्नीची जीवन यात्रा संपून स्वतः आत्महत्या केली होती. असे अनेक प्रकार राज्यात घडत आहेत व हजारो कुटुंबे उध्वस्त होत आहे.

तामिलनाडू सकारने अलीकडेच अध्यादेश काढून ऑनलाईन च्या सर्व खेळांवर बंदी घातली आहे. बेटिंग आणि जुगारासह ऑनलाइन गेमवर बंदी घालण्यासाठी हा अध्यादेश काढला. ज्याद्वारे जुगार आणि ऑनलाइन गेमवर बंदी घालण्यात येणार आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के. चंद्रू यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने ऑनलाइन गेमवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. तसा अध्यादेश महाराष्ट्र सरकारने काढून युवा पिढीला यातून बाहेर काढावे त्याकरता महाराष्ट्र सरकारने सुद्धा यावर बंदी घालण्याची मागणी सभागृहात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment