भद्रावती तालुका प्रतिनिधि जावेद शेख :मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला पूर आल्याने अखेर मध्यरात्री पासून तालुक्यातील पिपरी गावाचा संपर्क तुटला आहे.
The appearance of an island came to Pimpri village, communication with the village was lost.
या गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले असून या परिसरातील पिपरी या गावासह कोची व घोणाड या गावातील गावकरी आपापल्या गावातच अडकले आहे. पिपरी गावच्या मागच्या भागातील घरापर्यंत पुराचे पाणी आले असून पिपरी वरून भद्रावती शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन किलोमीटर पर्यंत पाणी पसरले असल्यामुळे दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे. शासकीय अधिकाऱ्यांनाही या तिन्ही गावात पुरामुळे जाणे शक्य नसल्यामुळे केवळ मोबाईल वरून या गावांशी ते संपर्क साधून पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहे. वर्धा नदीचे पाणी सारखे वाढतच असल्यामुळे गावकऱ्यांनी जनावराचा चारा व आवश्यक ते सामान सुरक्षित ठिकाणी हलविणे सुरू केले आहे तर पूर लवकर ओसरावा यासाठी गावकऱ्यांनी गावातील मंदिरामध्ये भजन सुरू केले. आहे तालुक्यात अद्यापही पाऊस सुरूच असल्यामुळे पूरस्थिती तीव्र होण्याचा धोका कायम आहे.
0 comments:
Post a Comment