तालुका प्रतिनिधी जावेद शेख
भद्रावती :एक ग्रूहीणी कौटुंबिक जबाबदारी सांभाळुन जनसेवा सुध्दा उत्तम प्रकारे करू शकते याचं मुर्तीमंत उदाहरण डॉ.सौ.अनुपमा जवादे ह्या आहेत.
वास्तुविशारद , रेकी ग्रंण्डमास्टर , टेरो कार्ड रिडर आणि ट्रेनर ,लामा फेरा आचार्य, ॲारा स्कॅनर अन्यालिसिस , एंजल डाऊझिंग हीलिंग थेरपी अशाप्रकारच्या अनेक अभ्यासक्रमात त्यांनी पारंगत प्रशिक्षण घेतले आहे.
Dr. Anupama Javade was honored with Nari Samman Award on 23 July 2023
२०२१ मध्ये पण त्यांना इंटरनॅशनल ट्रेडिशनल हिलरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
वरोराच्या डॉ.सौ.अनुपमा जवादे यांच्या उपचारांचा अनेकांना लाभ झालेला असुन अनेकांचे जीवन नकारात्मकतेतुन सकारात्मकडे बदलले आहे त्यांच्या हिंलिग अभ्यासामुळे अनेक असाध्य आजार पूर्णपणे बरे झाले आहे
त्यांनी दिलेल्या वास्तुशास्त्र मार्गदर्शनामुळे अनेकांच्या आर्थिक आणि मानसिक स्थितीमध्ये आमुलाग्र बदल घडवून सुधारणा झाल्या आहेत.
एक महिला स्वतःच्या ज्ञानातून अनेक लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकते कारण सावित्रीच्या लेकी अनेक वर्षांपासून समाजपयोगी कार्य करत आल्या आहेत.कधी आई कधी बहीण कधी पत्नी कधी शिक्षिका प्रत्येक रुपात समाजाची सेवा करण्याच व्रत पूर्ण करत आहेत.
एक स्री शिकली तर समाजातील सर्व घटकांना आपल्या ज्ञानाचा अभ्यासाचा दैनंदिन जीवनातील निराशा संपविण्यासाठी उपयोगात आणु शकते असेच प्रयत्न सौ.डॉ जवादे करत आहेत त्यांना मिळालेला नारी सन्मान हा पुरस्कार यथायोग्य आहे.
योग्य व्यक्तीला सुयोग्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचा वरोरा येथील नागरिकांना सार्थ अभिमान आहे.
0 comments:
Post a Comment