Ads

लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध राष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य कष्टकरी, उपेक्षित समाजाशी नातं सांगणार असून त्यांचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ व साहित्यिक ॲड. कृष्णा पाटील यांनी केले ते प्रागतिक लेखक संघ, निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मानाचा, सन्मानाचा लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ समाजसेविका, धम्मलिपी प्रशीक्षिका, कवी आणि संपादिका छाया पाटील (मुंबई) आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते, डॉ. नंदकुमार गोंधळी (कोल्हापूर) यांना मानाचा फेटा, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपयांची पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. Democrat Anna Bhau Vikhavedh National Award presented to Dr. Shankar Andani
राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक व विचारवंत राजाभाऊ शिरगुप्पे, डॉ. बाबुराव गुरव, माजी आमदार राजीव आवळे, ज्येष्ठ सामाजिक विचारवंत प्रा. टी. के. सरगर, कवी व लेखिका डॉ. शोभा चाळके, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तासगाव, जि. सांगलीचे माजी नगराध्यक्ष अमोल (नाना) शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला तर शाहीर दिपक गोठणेकर, किरण भिंगारदेवे, काळुराम लांडगे, लक्ष्मण माळी, रेवती आढाव, संग्राम मोरे, प्रा. डॉ. हाशिम वलांडकर, शंकर पुजारी, प्रा. डॉ. सविता व्हटकर, अभिजित पवार, सागर परीट, निलेश मोहिते, जयश्री चांदणे, रामचंद्र गुरव, सुनंदा दहातोंडे, डॉ. मानसी पवार, नंदू पवार, प्रा. विलास वैराळ, डॉ. शंकर अंदानी, विनोद त्रिभुवन गीता लळीत, विनोद आवळे, नथानियल शेलार, मुकुंद आव्हाड, डॉ. ज्ञानोबा कदम, डॉ. आनंद घन, मधुकर हुजरे, प्रा. डॉ. विजयकुमार सोन्नर, प्रा. अभय पाटील, छाया उंब्रजकर यादी मान्यवरांचा सन्मानचिन्ह व चार हजार रुपयांची पुस्तके देऊन लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक अनिल म्हमाने यांनी, सूत्रसंचालन स्वप्निल गोरंबेकर तर नामदेव मोरे यांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment