Ads

वेकोली कुचना मुख्यालयासमोर इंटकचे धरणे आंदोलन तथा सांकेतिक उपोषण.

तालुका प्रतिनिधी जावेद शेख :
कामगारांची सुरक्षितता, कानूनी अधिकार, कल्याणकारी योजनांच्या पूर्तता व अन्य न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी इंटक कामगार संघटनेच्या राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघातर्फे दिनांक 4 रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजता वेकोली माजरी क्षेत्राच्या कुचना येथील मुख्य वेकोली कार्यालयासमोर धरणे आंदोलन तथा सांकेतिक उपोषण करण्यात आले. माजरी क्षेत्राचे इंटक संघटनेचे अध्यक्ष धनंजय गुंडावर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात व उपोषणात वेकोली माजरी क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. INTUC's dharna protest and symbolic fast in front of WCL Kuchna headquarters.
नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला . महिला आश्रीतांना प्रशिक्षण देण्यात यावे, बोर्ड व्दारा अयोग्य घोषित करण्यात आलेल्या आश्रीतांना रोजगार देण्यात यावा,एससी एसटी कामगारांचा अनुशेष भरून काढावा, कोळसा खदान बंद करण्याच्या प्रक्रिया थांबवाव्या, एनसीडब्लुए समझौत्या अनुसार कमजोर कामगारांच्या मेडिकल परीक्षा आयोजित कराव्या,आश्रीतांना रोजगार देण्यासंबंधी होत असलेला विलंब टाळावा, आश्रितांच्या नोकरी आवेदनाकरिता, स्थलांतरण तथा मेडिकल बिलाचे पोर्टल तयार करावे, कामगारांचा इलाज कॅशलेस करून पॅनल हॉस्पिटलच्या प्रतिबंध हटवावा, भूमिगत कामगारांना अद्यावत सुरक्षितता प्रदान करण्यात यावी, खाणीच्या परिसरातील वन्यजीवांपासून कामगारांना सुरक्षा कवच द्यावे. अशा विविध मागण्या सदर आंदोलनाच्या माध्यमातून वेकोली प्रशासनासमोर ठेवण्यात आल्या. इंटक अध्यक्ष धनंजय गुंडावर यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या धरणे आंदोलनात व उपोषणात संघटनेचे अध्यक्ष धनंजय गुंडावार, सचिव परमानंद चौबे , संजय दुबे हंसराज पारखी, चंद्रकांत बोढाले, धर्मा गायकवाड, सुनील श्रीवास्तव, इकबाल भाई ,अनिल सिंग, रवि आवारी, कृष्णा चांभारे, चिंतामण आत्राम, बाबा आसवले ,मुरली सिंग, शंकर-पितुरकर ,दत्तू सैताने, रामप्रसाद पांडे, पवन राय, मोहम्मद कुरेशी, अतुल गुप्ता, सुधाकर बेलखूडे आदींसह मोठ्या संख्येने इंटेक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment