Ads

सुखी जीवनासाठी निरामय आरोग्य महत्त्वाचे- संजय मिश्रा

भद्रावती तालुका प्रतिनिधी:
मानवी जीवनात आरोग्याला अत्यंत महत्त्व असून सुदृढ आरोग्यामुळे माणूस जास्त काळ आपले सुखी जीवन जगू शकतो त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेत आपले जीवन उपभोगले पाहिजे असे प्रतिपादन निलजर्ई उपक्षेत्रीय प्रबंधक संजय मिश्रा यांनी केले. वेकोली वणी क्षेत्राच्या क्षेत्राच्या आदेशानुसार निलजर्ई उपक्षेत्रातर्फे नायगाव (बृ) येथे एका रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात ते बोलत होते.Good health is important for a happy life - Sanjay Mishra
या शिबिराचे उद्घाटन निलजर्ई उप क्षेत्रीय प्रबंधक संजय मिश्रा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कार्मिक प्रबंधक विनोद पाटील, नेत्र तज्ञ डॉ. अमोल काटकर, डॉ. पराग पांडे, सरपंच गणेश मेश्राम, उपसरपंच आनंद बोबडे, सचिव माने आदी मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.
या शिबिरात तीनशे रुग्णांनी सहभाग घेऊन आपल्या विविध रोगांवर उपचार करून घेतले. विशेष म्हणजे सध्या परिसरात डोळ्यांची साथ चालू आहे यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून त्यांना आवश्यक त्या औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्मीक प्रबंधक विनोद पाटील यांनी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेत वेळीच आलेल्या रोगावर उपचार करून आपले जीवन सुसह्य करण्याचे आवाहन केले. या शिबिराला घुगुस येतील राजू रतन केंद्रीय चिकित्सालय व सुंदर नगर येथील वैद्यकीय चमुने प्रत्यक्ष सहभाग घेऊन शिबिरातील रुग्णांवर उपचार करून त्यांना आवश्bयक ते मार्गदर्शन केले .या शिबिराचे संचालन व आभार विनोद पाटील यांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment