Ads

शहराला पाणी पुरवठा करणारे जलस्त्रोत दुषित होऊ देऊ नका - आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर :चंद्रपूरकरांसाठी जलवाहिनी असलेल्या इरई नदीतील पाणी दुषित झाल्याच्या घटना वारंवार घडत आहे. ही बाब नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असल्याने असे प्रकार खपवून घेतल्या जाणार नाही. भविष्यात असे प्रकार घडणार नाही यासाठी संबंधित सर्व विभागाने आपसात योग्य समन्वय ठेवत शहराला पाणी पूरवाठा करणारे जलस्त्रोत दुषित होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांना केल्या आहे.Do not allow the water sources that supply water to the city to be polluted. Kishore Jorgewar
शहरातील इरई नदीतील पाणी दुषित झाले आहे. त्यामुळे आमदार किशोर जोरगेवार यांनी हिराई विश्रामगृह येथे विविध विभागाच्या अधिका-यांची बैठक घेत त्यांना आवश्यक सुचना केल्या आहे. बैठकीनंतर त्यांनी दाताळा जवळ असलेल्या मनपाच्या जलशुध्दीकरण केंद्राला भेट देत नदीपात्रातील पाण्याची पाहणी केली. यावेळी सिएटीपीएसचे मुख्य अभियंता जि. एस कुमरवार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, मनपा शहर अभियंता महेश बारई, सीएसटीपीएसचे रामटेके, प्रदूषण विभगाचे अधिकारी उमेश भादुले, तहसीलदार विजय पवार आदी अधिका-यांची उपस्थिती होती.
इरई नदीतील पाणी गढूळ झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शहरातील काही भागातील पाणी पूरवठा बंद ठेवण्यात आला आहे. या पाण्याचा नमुनाही तपासणी करिता लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे. याचा अहवाल येईपर्यंत पाणी पूरवठा बंद राहणार असल्याचे महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. सिएसटीपीएस चे घाण पाणी इरई नदीपात्रात सोडल्याने पाणीसाठा प्रदूषित झाल्याचे बोलल्या जात आहे. प्रदूषण विभागाच्या वतीने सिएसटीपीएस कंपनीला नोटीस बजावली आहे.
दरम्यान आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांसह इरई नदीची पाहणी केली असून पाणी प्रदूषित होण्यामागची कारणे जाणून घेतली आहे. पाणी दुषित झाल्याने शहरातील काही भागातील पाणी पूरवठाही बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या भागात महानगरपालिकेने टँकरने पाणीपुरवठा करावा अशा सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-यांना केल्या आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपाच्या जलशुध्दीकरण केंद्रालाही भेट देत शुध्दीकरण केंद्राच्या वतीने पाणी शुध्द करण्याच्या प्रक्रियेबाबतची माहिती जाणून घेतली. पाणी पूर्णत: शुध्द झाल्याशिवाय येथील पाणी नागरिकांना पूरविण्यात येऊ नये अशा सुचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहे. पाणी पुरवठा बंद असलेल्या भागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याच्याही त्यांनी मनपा प्रशासनाला सूचना केल्या आहे. नागरिकांना दुषित पाण्याचा पूरवठा होणार नाही याकडे विषेश लक्ष देण्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-यांना सांगितले आहे.
उद्वभवलेल्या परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा काढून पाणी शुद्धीकरण करत किंवा आवश्यक त्या उपाययोजना करून पाणी पूरवठा सुरळीत करण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सुचनाही यावेळी त्यांनी मनपा प्रशासनाला केल्या आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, आदिवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, अल्पसंख्याक विभागाचे शहर युथ अध्यक्ष राशेद हुसेन, शहर संघटक विश्वजीत शाहा, युवा नेते अमोल शेंडे, विनोद अनंतवार हरमन जोसेफ, अॅड. परमहंस यादव,ताहिर हुसेन, कार्तिक बोरेवार, सतनाम सिंह मिरधा, उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment