Ads

कमिशन खोरीच्या वादात चंद्रपुरातील हा रस्ता चोरीला-राजु कुडे

चंद्रपूर : शहरातून बल्लारपुरकडे जाणारा रस्ता बागला चौक ते अभियांत्रिकी कॉलेज या ठिकाणी अनेक अपघात होऊन अनेकांनी आपले प्राण गमावले या रस्त्याची नागरिकांकडून वारंवार मागणी होत होती. काही महिन्यापूर्वी स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते.मोठा गाजावाजा केला गेला तसेच रस्त्याचे फलक शहरात लावण्यात आले . परंतु या रस्त्याचे काम अर्धवट सोडून कंत्राटदाराने तेथून पळ काढल्याने जनतेमध्ये प्रशासना विरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. आम आदमी पार्टी च्या टीमने अधिक माहिती घेतली असता अधिकच्या कमिशन खोरी मुळे कंत्राटदाराचा वाद झाला असे कळले.कमिशनखोरीमुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.This road in Chandrapur was stolen in the dispute of commission embezzlement-Raju Kude
या रोड वरती जिल्ह्यातील विद्युत विभागाचे मुख्य कार्यालय तसेच अभियांत्रिकी महाविद्यालय असल्याने तथा बल्लारपूर कडे जाणारा मुख्य मार्ग असल्याने येथे दररोज रहदारी असते. खड्डेमय रस्त्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी होत असतात.
आज आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील मुसळे यांचा मार्गदर्शनात तथा राजु कुडे यांच्या नेतृत्वात या रस्त्याला आमदार किशोर जोरगेवार गड्डा रस्ता असे नावं देण्यात आले. सोबतच हा रस्ता चोरीला गेला असल्याने आमदार यांनी हा रस्ता तात्काळ शोधून आणून जनतेच्या सेवेत तत्पर करून द्यावा. अशी विनंती सुध्दा करण्यात आलेली आहे.
तात्काळ काम झाले नाही तर जनतेला सोबत घेऊन चक्का जाम आंदोलन करू असा इशारा राजु कुडे यांनी दिला.

यावेळेला आप चे शहर सचिव राजू कुडे, झोन सह संयोजक जयदेव देवगडे, प्रभाग अध्यक्ष अनुप तेलतुंबडे, प्रशांत रामटेके, सागर बोबडे, भिमराज बागेसर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment