Ads

निरामय आयुष्यासाठी आहारात रानभाजी आवश्यक: आ.प्रतिभा धानोरकर.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :मानवाच्या निरामय आहारासाठी निसर्गाने अनेक रानभाज्यांची उपजत निर्मिती केली आहे. या रानभाज्यांचे आपले महत्त्वाचे गुणधर्म आहे. त्यामुळे मानवाने आपल्या आहारात प्रत्येक हंगामात निघणाऱ्या विविध रानभाज्यांचा समावेश करून निरामय आयुष्यासाठी या भाज्यांचे सेवन केले पाहिजे असे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.
Wild vegetables are essential in diet for a healthy life: MLA.Pratibha Dhanorkar.
शहरातील सेवादाल मैदानात दिनांक 12 रोज शनिवारला रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जिल्हा कृषी अधिकारी तोटावार सुरज गावंडे, दत्तात्रय गुंडावर, तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव माजी पंचायत समिती सभापती प्रवीण ठेंगणे आदी मान्यवर उपस्थित होते. निसर्गाने प्रत्येक हंगामात विशिष्ट प्रकारच्या रानभाज्यांची निर्मिती केली आहे. या रानभाज्या त्या त्या हंगामात आरोग्यासाठी लाभदायक असतात. त्यामुळे आजच्या पिढीने या रानभाज्यांची व त्यांच्या गुणधर्मांची माहिती जाणून घेऊन या रानभाज्या आपल्या आहारात समाविष्ट कराव्यात असे आवाहन यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले. सदर रानबाजी महोत्सवात तरोटा, पात्रू, गोफीन,रानधोपा, धाणबाजी,वेळूचे कोंब, काटवल आदी रानभाज्यांचे स्टाल लावून त्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.यावेळी रानभाज्यांमध्ये असलेल्या आरोग्यदायीv गुणधर्मांची माहिती देण्यात आली. या रानभाजी महोत्सवात शहरातील नागरिक, तालुक्यातील शेतकरी तथा गावकरी सहभागी झाले होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment