Ads

अनुश्री, पुणम व समिक्षा ठरले चित्रकला स्पर्धेतील मानकरी

चंद्रपुर :-नेहरू युवा केंद्र चंद्रपूर Nehru Yuva Kendra Chandrapur (युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार)जल शक्ती मंत्रालय जल संसाधन, नदी विकास और गंगा संरक्षण विभाग आणि बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट चंदनखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने जल शक्ती अभियान अंतर्गत 'कॅच द रेन 'कार्यक्रम या विषयावर चंदनखेडा येथील नेहरू विद्यालयात आज दिनांक १२ आगस्ट २०२३ शनिवार ला. आयोजित चित्रकला स्पर्धेत तीन विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
Anushree, Poonam and Samika became the winners of the painting competition
यामध्ये प्रथम क्रमांक अनुश्री डोमाजी भागवत व दितीय क्रमांक पुणम सुनिल गोहने आणि तृतीय क्रमांक समिक्षा शरद भागवत.यांना प्राप्त झाले.विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.पाण्याचे महत्व समजून इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी 'कॅच द रेन '  'Catch the Rain'या शीर्षकाखाली रेन वॉटर हार्वेस्टिंग (Rain water harvesting),शोष खड्डा, वनराई बंधारा, शेततळे (हौद) इत्यादी संकल्पना व पाण्याचे महत्त्व समजावे या हेतूने सदर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.सदर चित्र ड्राईंग शीट वर काढण्याचे आव्हान नेहरू युवा केंद्र चंद्रपूर (युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार) चे जिल्हा युवा अधिकारी समशेर सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय युवा स्वयंसेवक तथा माजी भद्रावती तालुका समन्वयक आशिष सुरेश हनवते यांनी केले होते. स्पर्धेविषयी योग्य असे मार्गदर्शन नेहरू विद्यालय चंदनखेडा चे मुस्खाध्यापक यशवंत पुनवटकर व चित्रकला शिक्षक नरेंद्र आस्कर, अविनाश लोणकर,श्याम जिकार,आरिफ शेख, भाऊराव मडावी,यांनी केले . स्पर्धा यशस्वीतेकरिता मित्र क्रिडा मंडळाचे अध्यक्ष तथा बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गटाचे सदस्य कुणाल गुलाब ढोक व शौर्य क्रिडा मंडळाचे सदस्य प्रविण वसंता भरडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment