Ads

कु. नीलिमा चव्हाण यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करुन फाशीची शिक्षा देण्यात यावी.Strict action should be taken against Neelima Chavan's killers and death sentence should be given.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख : ओमळी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील कु. नीलिमा सुधाकर चव्हाण वय २४ वर्षे हि दापोली येथील स्टेट बँक येथे कंत्राटी कामावर नौकरीवर होत्या दि. २९/७/२०२३ रोजी कामावरुन परत येत असताना तिचे अपहरण करून तिच्यांवर अत्याचार करून डोक्यावरील केस काढून चेहरा विदृप करून खुन करण्यात आला. तिचा मृतदेह दाभोळ खाईमध्ये दि. ०१/०८/२०२३ ला आढळून आला नाभिक समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातील ह्या मुलीचा खून करणाऱ्या नराधमाला अटक करून कठोरातील कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी.  Strict action should be taken against Neelima Chavan's killers and death sentence should be given.
अन्यथा नाभिक समाज संघटना रस्त्यावर उतरले व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील.अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी,  पालकमंत्री मा.ना.सुधीर मुनगंटीवार व आ. प्रतिभाताई धानोरकर यांना प्रतिलिपी पाठविण्यात आले आहे. 
      यावेळी उपस्थित भद्रावती नाभिक समाजाचे अध्यक्ष बंडू व्ही लांडगे, नाभिक सलुन दुकानदार असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन नक्षिणे, नाभिक युवा शक्ती चंद्रपूर जिल्हा सदस्य राजेश येसेकर,नाभिक महिला संघटनेच्या सचिव  सौ. वर्षाताई वाटेकर, अखंड नाभिक महिला विदर्भ प्रांताध्यक्ष्या ज्योतीताई लांडगे, शोभाताई लांडगे, सविता लांडगे, नंदनी लांडगे, वैशाली दळवी, मधुकर वाटेकर, हनुमान नक्षिणे, सागर घुमे, सतिश मांडवकर, सुधीर v जांभुळकर,अंकुश दर्वे,विजय मेश्राम, गणेश दैवलकर इत्यादी होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment