Ads

देहव्यापार प्रकरणी १३आरोपींना न्यायालीन कोठडी

वरोरा (प्रती):-बेपत्ता मुलीचा शोध घेत असताना वरोरा पोलिसांना अल्पवयीन मुलगी आढळली आणि शहरातील मोठे देहव्यापाराचे नेटवर्क उघडे पडले.Extra-judicial custody of 13 accused in prostitution case
A case has been registered against four people in the Video viral case
अल्पवयीन मुलीला देहव्यापारात महिला व पुरुष एजंटने ढकलत तिला विविध ग्राहकाकडे पाठविण्यात आले होते, काही आरोपींनी तीच्यावर चाकुचा धाक दाखवत गँग रेप ही झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले, या मध्ये १३आरोपींना अटक करुन त्यांची न्यायालीन कोठडीत रवानगी करण्यात आली, सदर गुन्हा हा अल्पवयीन मुलीच्या देहव्यापाराचा असल्याने या गुन्ह्याची सूत्रे उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष् नोपानी यांनी आपल्या हाती घेतली आणि तपासाची चक्रे फिरवत सबळ पुराव्याच्या आधारे १३ आरोपींना अटक केली,याच तपासादरम्यान एका तथाकथित नेत्याने त्या अल्पवयीन मुलीसोबत आक्षेपार्ह संभाषण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केला, यामुळे जनमानसात संताप व्यक्त होत होता, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर कारवाई केली जावी, अशी जनसामान्यात चर्चा होती. परंतु कुठल्याही प्रकारचा विलंब न करता आयुष नोपानी यांनी तथाकथित नेता रमेश कवडूजी मेश्राम, महेश मारुती जिवतोडे, राकेश वामन शिंदे व एका अज्ञाताविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या तपासात आयुष नोपानी यांच्या नेतृत्वाखाली वरोरा पोलीसांनी दमदार कारवाई केल्याने जन माणसांकडून वरोरा पोलिसांवर शाब्बासकीची थाप पडत आहे....
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment