Ads

आदर्शचंदनखेडा ग्रामपंचायत येथे मेरी मिट्टी मेरा देश या शासनाच्या योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख : आपल्या देशाला 2047 पर्यंत पूर्ण विकसित करून देशाला महासत्ता बनवायचे आहे. त्यासाठी देशाच्या प्रत्येक नागरिकाने कर्तव्य दक्ष बनायचे आहे या संकल्पनेला घेऊन आजादी का अमृत महोत्सव या अंतर्गत चंदनखेडा येथील ग्रामपंचायत कार्यालयातर्फे गावात केंद्र शासनाच्या मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच नयन जांभुळे यांचे हस्ते करण्यात आले.
Organized the program of Meri Mitti Mera Desh at Adarsh ​​Chandankheda Gram Panchayat.
या निमित्ताने गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व गावातील पदाधिकाऱ्यांनी आयोजित कार्यक्रमात देशाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. या निमित्ताने गावात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले तसेच 9 ऑगस्ट या क्रांती दिनाचे औचित्य साधून क्रांतीविर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाला सरपंच श्री.नयन बाबाराव जांभुळे, उपसरपंच सौ. भारती शरद उरकांडे ग्रामविकास अधिकारी किशोर नाईकवार ग्रामपंचायत सदस्य श्री निकेश भागवत श्री बंडूजी निखाते श्री नानाजी बगडे सौ प्रतिभा दोहतरे सौ. मुक्ता ताई सोनुले, सौ. सविता गायकवाड सौ आशा नंनावरे सौ रंजना हनवते सौ श्वेता भोयर कृषी सहाय्यक सौ गाजभे, नेहरू विद्यालय चे मुख्याध्यापक श्री यशवंत पूनवठकर, जी. प. उच्च प्राथ. शाळा मुख्याध्यापक सौ आइंचवार नेहरू विद्यालय चांदणखेडा चे मुख्याध्यापक श्री पूनवथकर सर शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष श्री अनिल कोकुडे जि प प्राथमिक शाळा माक्ता ठक सर शासकीय आश्रम शाळा चंदनखेडा मुख्यद्यापक सोनावणे सर उपस्थित होते.
गावातील सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमाला गावकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment