Ads

वाघाच्या हल्ल्यात एक गाय ठार तर दुसरी जखमी.

भद्रावती तालुका प्रतिनिधी
जावेद शेख :- Tiger attack तालुक्यातील चारगाव, कुरोडा परिसरातून आलेल्या वाघाने शहरातील केसुर्ली परिसरात आपला तळ ठोकला असून या वाघाने केसुर्ली परिसरातील एका शेतात एका गाईला ठार मारले असून दुसरीला जखमी केल्याची घटना भद्रावती शहरालगतच्या केसुर्ली शेतशिवारात घडली. यात सदर शेतकऱ्याचे जवळपास 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.One cow was killed and another injured in a tiger attack.
केसुर्ली शिवारातील राजू खामकर यांची शेतात त्यांची एक जर्सी गाय व एक संकरित जर्सी गाय चरत होती. दुपारच्या वेळेस वाघाने या गायींवर हल्ला केला. त्यात एका गायीचा मृत्यू झाला तर दुसरी गाय जखमी झाली. दुधाळ गाय असल्याने शेतकऱ्याचे नुकसान झालेला आहे या घटनेचा वनविभागातर्फे पंचनामा करण्यात आला. त्यानंतर या स्थळावर कॅमेरे लावण्यात आले. त्यानंतर या कॅमेरा मध्ये सदर वाघ कैद झाला आहे. हा वाघ गेल्या आठवड्यापासून शहरालगत फिरत आहे. पालिकेच्या घनकचरा प्रकल्पालगत याच वाघाने आठवड्यापूर्वी दर्शन दिले होते.मात्र हा वाघ अद्यापही शहरालगत फिरत असल्यामुळे शहरातील केसुरली व विंजासन भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील नागरिकांना बाहेर फिरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन भद्रावती नगरपालिका प्रशासन व वन विभागाने केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment