तालुका प्रतिनिधी जावेद शेख :
भद्रावती शहरा लगतच्या चारगाव व कुरोडा भागात धुमाकूळ घातल्यानंतर या वाघाने आपला मोर्चा शहरातील विजासन परिसरातल्या नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पाकडे वळविला असून घनकचरा प्रकल्पाच्या मागील भागात रात्रोला वाघ आढळून आला.याची माहिती नगरपरिषद प्रशासनाने भद्रावती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाच्या चमूने या भागात येऊन पाहणी केली असून या वाघाला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्याचा निर्णय घेतला आहे. Tiger's entry into municipal solid waste project area
या दोन दिवसात येथे पिंजरे लावण्यात येणार आहे.हा वाघ या परिसरात फिरत असल्यामुळे शहरातील विंजासन, केसुरली व शहरालगत असलेल्या कुरोडा, देऊळवाडा,कुणाडा,चारगाव या गावपरिसरातील नागरिकांनी तथा या रस्त्यावरून येजा करणाऱ्या वेकोली कर्मचाऱ्यांनी बाहेर निघताना सावधगिरी बाळगावी व एकट्या दुकट्याने रात्रीच्या वेळेस या भागात फिरू नये असे आवाहन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले आहे. चारगाव परिसरात तीन वाघ असल्याचे गावकऱ्यांचे तर दोन वाघ असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. काही दिवसापूर्वी या वाघाने चारगाव परिसरात धुमाकूळ घातल्यानंतर ते कुरोडा भागात आढळले होते.मात्र रात्रोला चक्क शहरातील विजासन परिसरात असलेल्या पालिकेच्या घनकचरा प्रकल्पामागे वाघ आढळून आल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालिकेचा घनकचरा प्रकल्प हा विजासन टेकडी परिसरात असून मागच्या भागात सर्वत्र झुडपी जंगल असल्यामुळे वाघांच्या वास्तव्यासाठी ही आदर्श जागा आहे. या रस्त्यावर गावकरी तथा वेकोली कर्मचाऱ्यांची रात्रीबबेरात्री सतत वर्दळ असल्यामुळे वाघाचे अस्तित्व चिंतेचा विषय ठरले आहे.
0 comments:
Post a Comment