Ads

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित ,गूरू नगर चिचोर्डी स्कूलबस लोकार्पण

तालुका प्रतिनिधी जावेद शेख:
स्थित, यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात आज स्कूल बसला प्रा.डाॅ. विशाल शिंदे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी विद्यालयात सुपूर्द करण्यात आली.याच वेळी विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणही करण्यात आले.
Run by Bhadravati Shikshan Sanstha Bhadravati, Guru Nagar Chichordi School Bus Launch
या संपूर्ण कार्यक्रमाला प्रा.डाॅ. विशाल शिंदे सर, प्राचार्य डाॅ. जयंत वानखेडे सर, मुख्याध्यापक शिंदे सर, ए.एम.देशमुख वसर, एम.एस.ताजने सर,बोढे सर, प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी उद्घाटनप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.जयंत वानखेडे सरांनी मुलांना बस वेळापत्रक तथा बसचे नियम समजून सांगितले तर प्रा.डाॅ. विशाल शिंदे सरांनी वृक्षारोपणाचे महत्व सांगितले.बाहेर गावावरुन ये-जा करणार्या मुलांना होणारा त्रास लक्षात घेऊन भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा ही स्कूल बस विद्यार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली.या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोढे सरांनी केले तर पाहूण्यांच आभार श्री मुख्याध्यापक ताजने सरांनी मानले.कार्यक्रमाला सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment