Ads

सिंदेवाही पोलीसांनी 12 तासात लावला अज्ञात वाहनाचा शोध व दोघांचे जीव घेणारे आरोपीचा छडा

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही : सिंदेवाही शहरापासून जवळच असलेल्या नवीन विरव्हा येथील अपघातात राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सिंदेवाही पोलिसांनी अखेर 12 तासात अज्ञात वाहनाचा शोध लावून ते दोघांचे जीव घेणारे चंद्रपूर येथील अज्ञात वाहन सेंट्रो कार सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे जमा केली आहे.
In 12 hours, the Sindewahi police traced the unknown vehicle and traced the accused who took the lives of two
सिंदेवाही तालुक्यातील अपघातात नवीन विरव्हा येथील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दादाजी शिवराम सावसाकडे वय 65 वर्ष, उदालक केशव हजारे वय 50 वर्ष रा.सरडपार चक यांचा अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तात्काळ मदतीस वाहनाने ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल केले.अपघातातील धडक दिलेल्या अज्ञात वाहनाचा शोध पोलिसांनी तात्काळ घेणे सुरू केले. अखेर 12 तासात पोलिसांनी त्या अपघातातील वाहनाचा कसून शोध घेतला असता MH 34 AA 7437 या क्रमांकाची हुंडाई सेंट्रो कंपनीची कार चंद्रपूर येथे मिळाली आहे. हुंडाई सेंट्रो कंपनीची कार सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे.वाहनाचे चालक आरोपी गजेंद्र गोमकर वय 35 रा. चंद्रपूर .यांना ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर पोलिसांनी तपास करीत असताना विविध ठिकाणी लावून असलेले कॅमेरे व नियोजन करून कार चे शोध लावण्यात यशस्वी कामगिरी केली असून सिंदेवाही पोलीस स्टेशन चे चव्हाण पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात, सागर महल्ले उप निरीक्षक , पोलीस देवानंद सोनुले, अरविंद मेश्राम, दादाजी रामटेके,मातेरे,जांभुळे,होमगार्ड कोकुलवार , पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment