Ads

शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्याकडून विद्यार्थीनीकरिता आर्थिक मदत

भद्रावती तालुका प्रतिनिधी : येथील प्रेरणा डोंगरे या विद्यार्थीनीची स्त्री सहाय्यिका परिचारिका (एएनएम) ANM प्रशिक्षणाकरिता निवड करण्यात आली. मात्र वडिलांची आर्थिक परिस्थिती ठिक नसल्यामुळे प्रशिक्षणाच्या पुढिल खर्चासाठी शिवसेना (उबाठा) गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्याकडून विद्यार्थीनीकरिता आर्थिक मदत करण्यात आली.
Shiv Sena (UBT) District Chief Mukesh Jivtode financial assistance for students
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारणा प्रेरित होऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे नेहमीच समाजोपयोगी कार्य करत असतात. यामध्ये विद्यार्थांना शैक्षणिक मदत, रुग्णांना आरोग्य विषयी मदत, दिव्यांग व्यक्तींना मदत तसेच समाजातील दुर्बल घटकांपर्यंत मदत पोहविण्यासाठी नेहमी तत्पर असतात.
परिचारिका प्रशिक्षण स्कूल सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे सन २०२३-२४ ला सुरू होणाऱ्या २ वर्षीय कालावधीच्या स्त्री सहाय्यिका परिचारिका प्रसाविका (एएनएम) प्रशिक्षणाकरिता भद्रावती येथील प्रेरणा डोंगरे हिची निवड करण्यात आली. परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चामुळे वडिलांसमोर चिंता निर्माण झाली. शिवसेना (उबाठा) गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचताच, त्यांनी प्रेरणाच्या वडिलांची भेट घेत आर्थिक सहाय्य केले. यावेळी शहर प्रमुख संदीप मेश्राम, शहर संघटक तथा माजी नगरसेवक किशोर टिपले, युवासेना समन्वयक तथा माजी नगरसेवक दिनेश यादव, उपतालुका प्रमुख सागर पिंपलशेंडे, शिवदुत मनीष ठक व आदी शिवसैनिक उपस्थिती होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment