घाटंजी( तालुका प्रतिनिधी):-येथे माजी केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहीर व् भाजपा जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे प्रमुख उपस्थितीत घर घर चलो अभियान अंतर्गत घाटंजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून रस्त्यावरील पायदळ जात नागरिकांना भेटी दिल्या केंद्र सरकार दवारे राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती व् कार्याची माहिती पत्रक वाटप करण्यात आले.
भाजपा शहर व् तालुका वतीने राष्ट्रीय जनहिताचे कार्याचे स्वरूप जनते पर्यंत पोहचविन्या साठी केंद्र सरकार च्या विविध महत्वपूर्ण योजनाची माहिती व्हावी यासाठी घर घर चलो अभियान राबविण्यात येत आहे
एलसीडी हॉल मध्ये झालेल्या कार्यक्रमात बूथ प्रमुख व् प्रमुख कार्यकर्ता सोबत संवाद साधला यावेळी अभियान प्रमुख नार्लावार यांनी पंचप्राण शपथ दिली प्रास्ताविक सुरेश डहाके यांनी केले तर संचालन प्रशांत उगले यांनी तर आभार मनोज हामंद यांनी मानले
माझी माती माझा देश या अभियान अतर्गत यावेळी सर्व बूथ प्रमुख यांनी गावागावातुन् आणलेली मुठ भर माती कलशात एकत्र करण्यात आली
यावेळी मंचावर जिल्हा सचिव किशोर बावने, कृ उ बा संचालक चंद्रकांत इंगळे , जेष्ठ नेते मधुसूदन चोपडे, आदिवासी आघाडी प्रमुख प्रतीक कुलसंगे, भटक्या जाती आघाडी प्रमुख मोहन जाधव, दत्ताभाऊ कोंडेकर,राजू शुक्ला, कृ उ बा संचालक नदकिशोर डंभारे, मन की बात प्रमुख संदीप माटे श. अ. राम खांडरे, ,महिला आघाड़ी अध्यक्ष रिना धनरे सोशल मिडिया प्रमुख अभिजीत झाडे उपस्थित होते
या कार्यक्रमासाठी स्वप्निल मंगले,
चेतन जाधव,विष्णु नामपेल्लीवार, पंकज ठाकरे, अनूप उप्पनवार , विशाल कदम प्रभाकर चटुले, अमित मह्हले ,पुंडलीक वाढई अंकुश ठाकरे , प्रणव वाघ अरुण गोहाड़े,नाना मस्के योगिता गढिया,सारिका उगले लता ठाकरे , ताई खांडरे सहयोग केला
0 comments:
Post a Comment