भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-भद्रावती तालुक्यातील काटवल येथील एका युवकाने चंदनखेडा परिसरातील इरई नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 16 रोज शनिवारला सकाळच्या सुमारास चंदनखेडा परिसरातील इरई नदी घडली.
Youth committed suicide by jumping into Irai river.
अक्षय खापणे वय 25 वर्षे, राहणार काटवल असे या आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असून पोलीस मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. या परिसरातून जाणाऱ्या काही लोकांना सदर युवक नदी काठावरून नदीच्या पाण्यात उडी घेताना दिसला. या घटनेची माहिती तात्काळ भद्रावती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर भद्रावती पोलीस स्टेशन ठाणेदार बिपिन इंगळे घटनास्थळी पोहोचले.चंद्रपूर येथील रेस्क्यू पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असुन ते बोटीच्या सहाय्याने नदीच्या पाण्यात सदर युवकाचा ते शोध घेत आहे. बातमी
लिहे पर्यंत शोध कार्य सुर होते
0 comments:
Post a Comment