Ads

विनयबोधी डोंगरे हयांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमीटी अनुसूचीत जाती विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती

 भद्रावती प्रतिनिधी जावेद शेख:- महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. डॉ. सिध्दार्थ हत्तीअंबीरे साहेब हयांनी नुकतीच भद्रावती येथील सामाजीक कार्यात अग्रेसर असलेले विनयबोधी डोंगरे हयांची महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली. Appointment of Vinaybodhi Dongre as Regional Vice President of Caste Department in Maharashtra Pradesh Congress Committee Schedule
विनय बोधी डोंगरे हे सामाजिक, धार्मीक, शैक्षणिक कार्यात अग्रेसर राहुन विजांसन बुध्द लेणीच्या विकासात मोलाचा वाटा उचलला, विजासन बुध्द लेणीची ओळख जागतीक स्तरावर करून देण्यास मोलाचा सहभाग आहे. तसेच गोर-गरीब, आर्थिक, दुर्बल घटकां करिता, शैक्षणिक कामातील शाळा कॉलेज, आय.टी.आय. अशा अनेक संस्था स्थापन केल्या. गेल्या अनेक वर्षापासुन त्यांची महाराष्ट्र कॉंग्रेस कमीटीच्या अनुसूचित जाती विभाग प्रदेश महासचिव म्हणुन त्यांनी कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेवुन आदरणीय सिध्दार्थ हत्तीअंबीरे साहेब हयांनी त्यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणुन नियुक्ती केली. त्या बद्दल त्यांचे विनय बोधी डोंगरे हयांनी आभार मानले, विनयबोधी डोंगरे हयांची उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, वरोरा भद्रावती क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर, नगराध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर, शहर अध्यक्ष सुरजभाऊ गावंडे, तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, सुधीर खोब्रागडे  जिल्हयातील काँग्रेसकर्त्यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment