Ads

गोवंश तस्काराविरूध्द स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची कारवाई

चंद्रपुर: जिल्हयातील गोवंश तस्कारांवर आळा घालण्याकरिता मा. पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते.Action of Local Crime Branch, Chandrapur against cow smuggling
त्यावरून घुग्घुस हद्दितून गणेशोत्सवा दरम्यान रात्रौ गोवंश ची अवैदयरीत्या वाहतुक होत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक मा. महेश कोंडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना गोवंश तस्कांविरूध्द कारवाई करण्याबाबत निर्देश दिले. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे विशेष पथकाने दि. २१/०९/२०२३ रोजी रात्रौ अं. २२:०० वा. दरम्यान घुग्घूस हद्दित एमआयडीसी - शेणगाव रोडवर सापळा रचून असता एक TATA XENON गाडी क. MH-04-GC-7497 हि पिकअप गाडी काहि गोवंश निर्दयपणे कोंबून वाहतूक करीत असतांना दिसून आल्याने सदर वाहनास विशेष पथकाने थांबवले असता ड्रायव्हर सदर वाहन वेगाने पळवू लागला. तेव्हा स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे विशेष पथकाने सदर पीकअप गाडीचा पाठलाग केला असता एका निर्जन स्थळी गाडी उभी करून अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. उभ्या TATA XENON गाडी क्र. MH-04-GC- 7497 ची पाहणी केली असता सदर वाहनात ०९ जिवंत गोवंश निर्दयपणे कोंबून असल्याचे दिसले. सदर ०९ जिवंत गोवंशची सुटका करून व वैदयकिय तपासणी करून प्यार फॉउंडेशन गौरक्षण संस्था, दाताळा येथे सुखरूप पोहचविण्यात आले.

TATA XENON गाडी क. MH-04-GC-7497 चा फरार चालक-मालका विरूध्द पो.स्टे. घुग्घूस येथे अप.क्र. ३९३ / २०२३ कलम ११(१),(ड) प्रा.नि.वि. कायदा १९६०, सहकलम ५ अ (१), ५ ब, ९, ११ महा. प्रा. संरक्षण कायदा, सहकलम ८३, १३० / १७७ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कामगिरी मा. पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी , मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांचे मार्गदर्शना खाली महेश कोंडावार, पो.नी स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वात सपोनी नागेशकुमार चतरकर, पोहवा धनराज करकाडे ब.नं. २०४०, स्वामीदास चालेकर ब.नं. २०६७, ना.पो.अ. अजय बागेसर ब.नं. १७८४, चंदू नागरे ब.नं. १९१२, पो.अ. प्रशांत नागोसे बनं २५७८, चानापोअ दिनेश अराडे ब.नं. २३१० यांनी यशस्वीपणे केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment