Ads

ढोरवासा येथील शेतीत निंदन करीत असताना निघाला आठ फुटाचा अजगर.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-भद्रावती शेतात सोयाबीन पिकात निंदन करीत असताना एका महिला मजुराच्या जवळच आठ फुटाचा भला मोठा अजगर निघाला. या अजगराच्या तावडीतून महिला मजूर बचावली. शेवटी भद्रावती येथून सर्पमित्र बोलावून या अजगराचे रेस्क्यू करण्यात आले. सदर घटना ढोरवासा येथे घडली. ढोरवासा येथील सुनील गोवारदिपे यांच्या शेतात महिला मजुरांतर्फे सोयाबीनचे निंदन सुरू असताना एका महिला मजुराच्या जवळच अचानक आठ फूट लांबीचा भला मोठा अजगर निघाला.
An eight-foot python came out while grazing in the field at Dhorwasa.
या अजगराला अगदी जवळच पाहून ती महिला ओरडत बाहेर पळाली. तिच्या ओरडण्याने बाकी महिला मजूर देखील घाबरून शेताबाहेर पळाल्या. या घटनेची माहिती शेतमालक सुनील गोवारदिपे यांना दिल्यानंतर त्यांनी प्रथम घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांनाही तो भला मोठा अजगर आढळून आला. त्यांनी लगेच भद्रावती येथील सर्पमित्रांशी संपर्क साधला असता सर्पमित्र अमृत बावणे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले व त्यांनी या अजगराला मोठ्या शिताफीने पकडून व त्याची वनविभागात नोंद करून सुरक्षित अधिवासात सोडले. या अजगराची लांबी पाहता या अजगरापासून सदर महिलेला धोका होऊ शकला असता. मात्र या अजगराचे अस्तित्व वेळीच लक्षात आल्यामुळे महिला मजूर यातून बचावली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment