Ads

वेकोलीत सिलेंडर चा स्फोट होऊन चार कामगार गंभीर जखमी.

घुग्घूस:-वेकोलीच्या जिओसी कोळसा खाणीमध्ये आज सकाळ पाळीत काही कामगार कोल हँडलिंग प्लांट बंकर मध्ये ब्रेक डाऊन चे काम करीत असताना अचानक हायड्रोलिक सिलेंडर चा स्फोट होऊन त्या ठिकाणी काम करणारे चार कामगार जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. Four workers were injured in a cylinder explosion in WCL
जखमी झालेल्या कामगाराचे नाव प्रभानंद कटकुलवार, रेखचंद ताजने, मारोती वनकर व विजय झाडे असे आहे. जखमीना ताबडतोब राजीव रतन दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले असून उपचार सुरु आहे.या घटनेची माहिती पोलिसांना होताच पोलीस राजीव रतन दवाखान्यात दाखल झाले.

वेकोलीच्या सुरक्षा अभावी तसेच नायट्रोजन सिलेंडर ऐवजी हायड्रोलिक सिलेंडर चा वापर केल्यामुळे सदर घटना घडली अशी वेकोली कामगारात दबक्या आवाजात चर्चा आहे.नायट्रोजन गॅस पेक्षा हायड्रोलिक गॅस ची किमत स्वस्त असल्यामुळे हा गॅस वापरला जात असल्याचे सांगितले जाते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment