Ads

भद्रावती ऑटो असोसिएशन ने त्या देवदूतचा केला सत्कार

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख: स्थानिक बस स्थानकासमोरील राजू महामार्गाला लागून असलेल्या नालीतून वाहत गेलेल्या आठ वर्षीय बालिकेला छगन बुरडकर या ऑटो चालकाने चक्क तिचा जीव वाचविला. अशा या देवदूताचे भद्रावती ऑटो असोसिशनने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन एका समारोहत सत्कार करण्यात आला. Bhadravati Auto Association felicitated that angel
दिनांक २४ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भद्रावतीत अचानक मुसळधार पाऊस कोसळला तेव्हा तालुक्यातील पिरली येथील सानवी मंगेश आसुटकर ही ८ वर्षीय बालिका भद्रावती बस स्थानकासमोरील राज्य महामार्गाला लागून असलेल्या पाण्याने तुडुंब भरलेल्या नालीतून वाहत गेली. ती जवळपास ४०० फूट अंतरापर्यंत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. तिने नालीच्या चेंबर वरील फरशीला धरून वाचवा वाचवा अशी विनवणी केली. अशातच ऑटो चालक छगन बुरडकर हा त्या ठिकाणी देवदूतच अवतरला. तिचे हाताची बोटे धरून त्याने शेजारील नागरिकांना मदतीसाठी बोलाविले. जमलेल्या लोकांनी नालीवरील सिमेंट काँक्रीटचे चेंबर उचलून त्या बालिकेला नाली बाहेर काढले. यातून ती बालिका सुदैवाने बाल बाल बचावली बालिकेच्या आई-वडिलांनी ऑटो चालकाचे आभार मानले. त्याच्या या साहसाबद्दल ऑटो भद्रावती ऑटो असोसिएशन च्या वतीने एका समारोहात असोसिएशनचे अध्यक्ष बाळूभाऊ उपलंचीवार यांचे हस्ते एका समारोहात त्याचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. ऑटो चालक छगन बुरडकर यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment