Ads

भद्रावती शहरात ईद ए मिलादून -नबी उत्सवात साजरी

जावेद शेख तालुका प्रतिनिधी
भद्रावती: मुस्लीम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज गुरुवारी भद्रावती शहरात दिमाखादार जुलूस काढण्यात आला. पोलिसांवर पडणारा ताण लक्षात घेऊन मुस्लीम बांधवांनी यंदा वेळेची मर्यादा बाळगून ‘जश्ने ईद मिलादुन्नबी’ साजरा केला. Eid-e-Miladun-Nabi festival celebrated in Bhadravati city
शहरातील जागोजागी मिठाई व खीरपुरी व जेवनाचे स्टाँल लावून गोर गरीब लोकांना मिठाई वाटली गेली. मुस्लीम समाज बांधवानी सकाळी गरीब नवाज मज्जिद भोज वार्ड मदिना मस्जिद मज्जिद मध्ये जाऊन (फजर) ची नमाज पठण करुन हाफिज मुजम्मिल यांनी कुराणाचे वाचण करण्यात आले व फतिया दरुद शरीफ करुण देशा सहीत तमाम जनतेसाठी अमन शांती ची दुवा मागण्यात आली. व परचम कुशाही करण्यात आली दरम्यान नातिया खाणी, कुरान पठण, महिला वर्गाच्या समुपदेश कार्यक्रम व दुसऱ्या दिवशी मुफ्ती जुबेर रजा वणी यांचेतकरीर कार्यक्रम आयोजित केला होता
मदिना मज्जिद व गरीब नवाज मज्जिद येथून जुलूसला प्रारंभ झाला. मक्का, मदीना ची झाकिया, घोडे, बालक, डीजेवरील धार्मिक गीते व कव्वालीचा निनाद, ध्वज फिरविणारे युवक, पारंपरिक वेशभूषेत सहभागी समाजबांधव असा जुलूसचा थाट होता. . ही रॅली भंगा राम वार्ड डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, ते चंडिका वॉर्ड ते पंचशील चौक, मार्गे डोलारा चौक, येथे अल्पो पोहार व खीर चे वाटप जशने ईद-ए-मिलादुन्नबी कमिटीतर्फे करण्यात आले होते हायवे बाळासाहेब प्रवेशद्वार यावेळी ठाणेदार बिपिन इंगळे याना शाल व श्रीफळ भेट देण्यात आले ही रॅली मेन रोड ते जामा मस्जिद मेहबूब सुभानी दर्गा जवळ सुफी ग्रुप तर्फे अन्नदान व जागो जागी ठिकाणी फळे व शरबती वितरण करण्यात आले समारोप करण्यात आला.

या वेळी ठाणेदार बीपीन इंगळे नगराध्यक्ष अनिल धानोरकर काँग्रेस शहराध्यक्ष सुरज गावंडे चंदू खारकर नगरसेवक यांनी मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित भद्रावती येथील मोठ्या उत्साहात हिंदु मुसलीम बांधव उपस्थित होते.
यंग मुस्लीम कमिटी सदस्य व आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. पोलीस बंदोबस्त चोख होता
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment