Ads

ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नाही, या राज्य सरकारच्या निर्णयाचे ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी मानले आभार

चंद्रपूर : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणार नाही त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, अजित पवार, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार व सर्व पक्षीयांचे डॉ. अशोक जीवतोडे यांनी जाहीर आभार मानले आहे. No reservation for Marathas from OBC state government's decision.OBC leader Dr.Ashok Jeevtode thanks Govt
काल (दि.११) ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत सर्व पक्षीय बैठक मुंबई येथे पार पडली. त्या बैठकीत सर्व पक्षीय नेत्यांतर्फे असे ठरले की, ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्या जाणार नाही. मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील ओबीसी प्रवर्गाला धक्का लागू न देता मराठ्यांना आरक्षण दिले जावे असे मान्य केले. यासाठी त्यांचे जाहीर आभार डॉ. अशोक जीवतोडे यांनी मानले.

मात्र या निमित्ताने बिहारच्या धरतीवर जात निहाय जनगणना करावी, विद्यार्थ्यांना वसतिगृह सुरू करावे व स्वाधार योजना सुरू करावी या व इतर मागण्या देखील सरकारने मान्य कराव्या असे मत देखील ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केले.

सोबतच काल (दि.११) ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून मराठ्यांना ओबीसी समाजात समाविष्ट करू नये, याबाबत चर्चा केली. तसेच नागपूर येथे सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात सहभाग घेवून मार्गदर्शन केले.

त्यानंतर मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी ओबीसी समाजाला चर्चेसाठी बोलवावे, असे पत्र देखील देण्यात आले आहे, असे डॉ. अशोक जीवतोडे यांनी सांगितले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment