Ads

भद्रावती येथील खेळाडूंची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख: चंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटने
Chandrapur District Athletics Association
तर्फे तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर, विसापूर येथे जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धाचे दिनांक २ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील रितिका बोस या खेळाडूंची गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक तसेच रोहन कांबळे या खेळाडूंची भालाफेक स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्यस्तरीय ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेकरिता निवड झाली.
Selection of athletes from Bhadravati for state level athletics competition
महाराष्ट्र राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा, महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन डेरवण, रत्नागिरी जिल्हा येथे ३० सप्टेंबर ते १ आक्टोंबर २०२३ या कालावधीत होणार आहे.
महाविद्यालयातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागप्रमुख प्रा. संगीता बांबोडे यांनी खेळाडूंना प्रशिक्षण दिले. खेळाडूंच्या या यशाबद्दल विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोराचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष जंयत टेमुर्डे, सचिव अमन टेमुर्डे, सहसचिव राजू गावंडे,प्राचार्य डॉ.नामदेव उमाटे, डॉ. विजय टोंगे, डॉ. ज्योती राखुंडे, डॉ.प्रकाश तितरे, डॉ सुधीर आष्टुनकर, प्रा. मोहित सावे, डॉ. यशवंत घुमे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment