Ads

रक्त चंदनाचे वृक्षारोपण करून वाढदिवस व रक्षाबंधन केला साजरा

राजुरा :आपल्या संस्कृतीत अनेक सणसमारंभाना अनन्यसाधारण असे महत्व आहे. प्रत्येक सणउत्सव हे अविस्मरणीय रहावे त्यातील आनंद हा नेहमीच आठवनींचा असावा असे प्रत्येकाला वाटते. तसेंच आपला वाढदिवस साजरा करताना आपल्या आवडीनिवडी जोपासत तो साजरा करण्याचेही प्रकार वेगवेगळे असतात . परंतु घरातील पर्यावरण संवर्धनाचे व मानवता विकासाचे कार्य हे सातत्याने सुरु असल्यामुळे रक्षाबंधन आणी सुवर्णा बेले, राजुरा तालुका महिला संघटिका, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांनी रक्त चंदन वृक्षारोपण करून या दोन्ही प्रसंगाना अविस्मरणीय करावे असा संकल्प केला.Birthdays and Rakshabandhan were celebrated by planting blood sandalwood trees
राजुरा तालुक्यातील तुलाना येथील शेतशिवारात रक्त चंदनाचे वीस झाडाचे वृक्षारोपण करून रक्षाबंधन व सुवर्णा बेले यांनी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी नीलकंठ बेले, शिला बेले, बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सारिका मनोज खणके, भास्कर बावणकर, शितल बावणकर, रक्षा बावणकर, मानव बावणकर, वेदांत खणके, विकास बेले, रुपाली बेले, मुग्धा बेले, दुर्वा बेले, बालसंघटिका, नेफडो, ओवी बेले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी उपस्थित सर्वांनी पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचा संकल्प घेत हे कार्य अविरतपणे सुरु ठेवणार असे मत व्यक्त केले.
सुवर्णा बेले, राजुरा तालुका महिला संघटिका
आपल्या आनंदी अनमोल अशा क्षणांना आणखी अनमोल करण्यासाठी म्हणून आम्ही रक्त चंदन वृक्षारोपणाचा संकल्प केला. वाढदिवस व रक्षाबंधन निमित्याने आम्ही सर्वांनी रक्त चंदन वृक्षारोपण करून या प्रसंगाला अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न केला. घरातील पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचे कार्य हे सातत्याने सुरु असल्यामुळे आपणही त्यात नेहमीच सहभागी व्हावे अशी इच्छा सदैव मनात असते.त्यात आपलाही खारीचा वाटा असावा याकरिता हे रक्त चंदन वृक्षारोपण केले. प्रत्येकाने आपल्या अधिकार व हक्का सोबतच कर्तव्याची जाणीव ठेवणे सुद्धा महत्वाचे आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment