चंद्रपुर : चंद्रपुर जिल्ह्यात अमली पदार्थ विक्री करणे व बाळगणान्यावर कठोर कारवाई करण्याचे पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी स्था. गु.शा. चंद्रपुर यांना आदेशीत केले होते त्या अनुशंगाने पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखली यांनी पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा यांना एक विशेष पथक तयार करुन कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या .Three drug dealers were arrested by the local crime branch Chandrapur
त्यानुसार दि. 01/09/2023 गोपनीय माहीती मिळाली की, बल्लारशाह बायपास रोड चंद्रपुर येथे एका पांढ-या रंगाची स्कॉरपीओ गाडी के. एम. एच. 33 ए.सी. 1101 मध्ये काही संशईत ईसम हे अमली पदार्थ आणुन ते विक्री साठी शेधत आहेत. अशा माहीती वरून पोनि स्था.गु.शा. चंद्रपुर यांचे आदेशा वरून विशेष पथकाचे पो. उप नि. अतुल कावळे व सोबत पो.स्टाफ असे कायदयाचे तरतुदीचे तंतोतंत पालन करून छापा कार्यवाही करीता रवाना होउन संशयीत वाहनाचा बल्लारशाह वायपास रोडने शोध घेत असताना नमुद संशयीत वाहन हे बजाज विद्या निकेतन शाळेच्या समोर उभे असल्याचे दिसुन आले. यावरून आम्ही तेथे जाउन वाहन चालक व त्याचे साथीदारास पोलिसांनी आपला व पंचांचा परीचय देउन त्यांना नाव गाव व पत्ता विचारले असता त्यांनी वुडवा वुडवीचे उत्तर दिले. यावरून पोलिसांना संशय येऊन पंचासह वाहानाची तपासनी केली असता एका निळया प्लॅस्टीक पन्नी मध्ये अंदाजे 5.213 ग्रॅम किंमत अंदाजे 52,130 /- रू. चा गांजा अमली पदार्थ मिळुन आला त्या नंतर वाहन चालकास व त्याचे साथीदारास विश्वासात घेउन नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे पुढील प्रमाणे सागीजले 1 ) यश राज दुर्योधन, वय 18 वर्ष, रा. बजाज शोरुम मार्ग टिचर कॉलनी, गडचीरोली 2 ) नेहाल इकरार ठाकुर वय 21 वर्ष, रा. गोकुल नगर गरुवदारा जवळ गडचीरोली 3)सगिर खान ननुआ खान, वय 32 वर्ष, हरा गोकुळ नगर गुरुवदारा जवळ गडचीरोली मुळे राह, निकोनी साहायपुर, गौतमबुद्ध नगर, उत्तर प्रदेश असे सांगीतले यावरून नमुद आरोपी सोबत अंदाजे 5.213 ग्रॅम किंमत अंदाजे 52,130 /- रू. चा गांजा अमली पदार्थ व सदर गुन्हया मधे वापरलेले वहान किमंत अंदाजे 15,000,00/- रू. आरोपीचे तिन मोबाईल किंमत अंदाजे 97,000/- रू असा एकुण 16,49,130 /- रू चा मुददेमाल ताब्यात घेउन पो.स्टे. रामनगर येथे अप क. 962/23 कलम 8 (क ) 20 (ब) (ii) (ब).41.43 एन.डी.पी.एस., 34 भादवी गुगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम (एन. डी.पी.एस.) 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.स्टे. रामनगर हे करीत आहे.
सदर कार्यवाही मा. रविंद्र परदेशी पोलीस अधिक्षक चंदपुर श्रीमती रिना जनबंधू अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर नंदनवार उपविभागिय पोलीस उधिकारी चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा पो.उप नि. अतुल कावळे, पो. हवा शकील शेख, नापोकों अनुप डांगे, मिलींद चव्हाण नितेश महात्मे जमीन पठाण, पोकों प्रमोद कोटनाके, प्रसाद धुळगंडे, चालक पोकों रूपभ बारसिंगे यांच्या पथकाने केली.
0 comments:
Post a Comment