Ads

एस टी बसच्या अपघातात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:चंद्रपूर-नागपूर हायवेवरील शहराजवळील सोनुर्ली हनुमान मंदिर परिसरात एसटीची धडक बसून जखमी झालेल्या महिलेचा अखेर नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
The woman who was injured in the ST Bus Accident finally died during treatment
प्रणिता उमेश देवगडे, वय 35 वर्ष, राहणार भंगाराम वार्ड. असे या मृतक महिलेचे नाव असून दिनांक 21 रोज गुरुवारला तिच्या पार्थिव शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आठ दिवस आधी सदर परिसरात गुरे हाकलीत सदर महिला मुख्य रस्त्यावर आली असता चंद्रपूर यवतमाळ मार्गे जाणाऱ्या एका एसटी बसने तिला धडक दिली होती.त्यात ती गंभीरित्या जखमी झाली होती. जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी नागपूर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची तक्रार भद्रावती पोलिसात करण्यात आली होती.या महिलेच्या मृत्यूमुळे परिसरात सर्वत्र व्यक्त होत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment