(प्रशांत गेडाम)सिंदेवाही- पोलीस स्टेशन सिंदेवाही हद्दीत येत असलेल्या पेंढरी (कोको.) ग्रामपंचात अंतर्गत पेंढरी, कोकेवाडा, मुरपार या तिन्ही गावात अवैध दारूविक्रीच्या अवैध धंद्याला ऊत आला असून गावातील महिला एकत्र येऊन महिला दारू बंदी समिती गठीत करण्यात आली.Women of three villages in Sindewahi united to ban illegal liquor, betting and gambling
दारुबंदीचे समितीचे अध्यक्ष व सचिव यांची निवड केल्या नंतर त्यांनी आपला मोर्चा पेंढरी तंटामुक्ती समिती व ग्रामपंचायत कडे वढवला. ग्रामपंचायत पदाधिकारी व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष यांना दारू, सट्टा, जुगार बंद करण्यासाठी महिलांना सहकार्य करावे लागेल असा आग्रह केला. तिन्ही गावातील महिलांचा आग्रह बघून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व एकोप्याने गाव दारू, सट्टा, जुगार मुक्त करण्याचे ठरविण्यात आले. महिलांनी गावात फेरी काढून अवैध गोरखधंदा बंदीवर ची जनजागृती केली.
यावेळी पेंढरी (कोको.) गावचे सरपंच तारा अरविंद राऊत, उपसरपंच निशांत चंद्रकांत शिंदे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष देवाजी गुरनुले, राजेंद्र भैसारे यांचा सहभाग होता.
0 comments:
Post a Comment