Ads

भद्रावती येथे रोग निदान व नव मतदार नोंदणी शिबिर

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-भद्रावती नगर परिषदेचे नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे शहर महामंत्री प्रशांत डाखरे यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून भद्रावती भाजप तर्फे शहरातील हुतात्मा स्मारक येथे मोफत रोग निदान शिबिर तथा नव मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. Disease diagnosis and new voter registration camp at Bhadravati
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून करण देवतळे, एहेतेश्याम अली, चंद्रकांत गुंडावार, सुनील नामोजवार, संजय वासेकर,मुकुंद राजूरकरष अफजल भाई, आशिष पोटे, अमित गुंडावार,अंकुश आगलावे, ऍडव्होकेट युवराज धानोरकर, अर्चना गुंडावर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर शिबिरात मधुमेह, सिकलसेल, एच. आय. व्ही.,ब्लडप्रेशर इत्यादी अनेक रोगांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात उपचारासाठी पात्र ठरलेल्या रुग्णांना शासकीय आरोग्य योजनेअंतर्गत उपचारासाठी निवडण्यात आले. सदर शिबिरात जवळपास 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली,तर जवळपास 80 नव मतदारांची नोंदणी करण्यात आली. सदर शिबिराला बालरोग तज्ञ डॉक्टर भावेश मुसळे, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर दिपाली मुसळे, अस्थिरोग तज्ञ डॉक्टर विनोद मुसळे, किडनी तज्ञ डॉक्टर राकेश अंबाती व हृदयरोग तथा मधुमेह तज्ञ डॉक्टर रागिनी राव अंबाती यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाचे संचालन विवेक सरपटवार यांनी केले. शिबिराला यशस्वी करण्यासाठी नाना हजारे, बबलू सय्यद, चेतन स्वान, इमरान खान, प्रज्वल नामोजवार, श्रुती नामोजवार, स्वाती डाखरे, लता भोयर, ममता गंडाईत, राम मत्ते, प्रदीप मांडवकर, अभिजीत नारळे, संदीप बोकारे,श्रीपाद ठाकरे,मोनु पारधे आदींनी सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment