बल्लारपूर :- शहरातील कोमलीका जयराज खोब्रागडे मिस महाराष्ट्र २०२३ ची मानकरी ठरली आहे.
दि लीला ऑम्बीयन्स हॉटल दिल्ली येथे पार पडलेल्या मिस & मीसेस प्लाईग फेम इंडीया 2023 या संस्थे मार्फत १ ऑक्टोबर ला पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात बल्हारपूर येथील कोमलीका खोब्रागडे हीने मिस महाराष्ट्र 2023 चा पुरस्कार आणि टोप पटकावला आहे. Komalika from Ballarpur is crowned 'Miss Maharashtra 2023'
देशातील सर्व राज्यातील 20 पेक्षा जास्त स्पर्धकानी सहभाग घेतला होता. कोमलीका खोब्रागडे हिने राँची, पुणे, मुंबई चंद्रपूर, नागपूर ईथे झालेल्या अनेक शो मध्ये प्रावीण्य मिळवले असुन पुणे येथील सिंहगड लॉ कॉलेज एल एल बी चे चौथे वर्ष सुरु असुन मॉडलींग या क्षेत्रात किमान 8 वर्षे वर्षापासून कार्यरत आहे.
बल्लारपूर सारख्या दुर्गम भागातून असून सुद्धा कोमलीका खोब्रागडे हिने दिल्ली सारख्या ठिकाणी पुरस्कार मिळवून बल्लारपूर आणि आई वडिलांचे नाव मोठे केले . या यशामुळे कोमलिका चे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 comments:
Post a Comment