Ads

पोलिसांच्या विविध गुन्ह्यातील साक्षीदाराला गाव सोडण्याची वेळ

चंद्रपूर : पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यात साक्षीदार असलेल्या आणि पोलिसांना वेळोवळी मदत करणाऱ्या साक्षीदाराला गावातील काही गुंडाकडून जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याने तसेच पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करून त्रास देण्यात येत असल्याने गाव सोडण्याची वेळ आली आहे. अरुण झाडे विरूर स्टे. असे या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, पोलीसही गुंडाच्या सांगण्यावरू न खोटे गुन्ह दाखल करीत असल्याचा आरोप अरुण झाडे यांनी चंद्रपूर येथे श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.Time to leave the village for a witness in various police crimes
श्रावणकुमार ओरगंटी, राजरेड्डी गोगुलवार, राधा सतीश ओरगंटी यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्याविरोधात दारूविक्रीची पोलिसात तक्रार केल्याचा संशय घेऊन वाद घालत मारहाण केल्याची तक्रार झाडे यांनी पोलिसांनी केली होती. या तक्रारीवरून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यानंतर वारंवार मला दमदाटी आणि धमक्या दिल्या जात आहे. याबाबत आपण विरूर पोलीस ठाण्यात अनेकदा तक्रारी केल्या आहेत. परंतु, पोलीस मलाच दमदाटी करून तक्रार घेत नाही. त्यामुळे गुंडांची हिमत वाढत आहे. यानंतर गुड्डू शेख यांनी रेती तस्करीची तक्रार केली म्हणून जिवे मारण्याची धमकी देत आहे. याबाबतची तक्रारही पोलीस ठाण्यात करण्यात आली. पंरतु, पोलिसांनी तक्रार घेतली नाही. गावातील दारूतस्कर, रेतीतस्करांना बळ देण्याचे काम स्थानिक ठाणेदार करीत असून गुंडांमुळे गाव सोडावे लागल्याने जगण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप झाडे यांनी केला आहे. ४ जुलै २०२३ रोजी काही दारूविक्रेत्यांनी चिरंजिव चिलका याला दारू पाजून मला मारण्यासाठी पाठविले. जगतसिंग यांच्या हॉटेलात बसून असताना चिलका यांने शिवीगाळ केली. पंरतु, मी पोलिसांना फोनवर माहिती दिल्यानंतर पोलीस आले. यांनतर पोलीस ठाण्यात गेलो. यावेळी पोलीस ठाण्यात गुड्डू शेख, राजरेड्डी गोगुलवार यांनी पोलिसांसमोर झाडाला बांधून मारण्याची धमकी देत होते. पंरतु, ठोणदारांनी कोणतीही कारवाईकेली नाही, असा आरोप अरुण आबाजी झाडे यांनी केला आहे.
मला वारंवार धमकी देणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी अरुण झाडे यांनी केली आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment