Ads

पत्रकाराला मारहाण,जीवे मारण्याची धमकी आणि मोबाईलही फोडला.? The journalist was beaten up, threatened with death and the mobile phone was also broken.?

गडचांदूर:-गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस{AP}चे नेते 'शरद सुरेश जोगी' यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या 'J-पॅलेस' नामक बार & रेस्टॉरंट,लॉजचे प्रकरण सध्या सर्वत्र गाजत असून जोगी यांनी खोटे शिक्के व खोट्या सह्यांच्या आधारे शासनाची दिशाभूल करत सदर बारचा परवाना मिळवल्याची तक्रार संबंधित विभागाकडे करून परवाना रद्द करावा आणि शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.The journalist was beaten up, threatened with death and the mobile phone was also broken.?

यासंदर्भात बातमी प्रकाशित करण्यापुर्वी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एका वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी,कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार 'गणेश लोंढे' यांनी जोगी यांना संपर्क केला असता फोनवर प्रतिक्रिया देत नाही,प्रत्यक्ष भेट मग देतो.!असे बोलून 'J-पॅलेस' बार मध्ये बोलवले.
दुरध्वनीवर प्रतिक्रिया देत नसल्याने साध्या मनाने गणेश लोंढे सदर बारमध्ये गेले असता त्याठिकाणी अगोदरच राजुरा येथील पत्रकार 'दिपक शर्मा' आणि नांदा येथील पत्रकार 'धनराज शेखावत' हे दोघे बसून होते.पत्रकार गणेश,यांनी प्रतिक्रिया विचारताच जोगी यांनी अश्लील शिवीगाळ करत 'तु भला मोठा पत्रकार झाला का ? माझी सत्ता आहे,पाहून घेतो तुमच्या सारख्या पत्रकारांना,असे म्हणत पत्रकार गणेश यांच्या हातातील मोबाईल हिसकावून जोरात जमिनीवर आपटला,खुर्ची उचलून मारली आणि उद्या जर बातमी आली तर तुला मारून टाकतो', अशाप्रकारे जीवे मारण्याची धमकी दिली.यात पत्रकार गणेश यांना गुप्त मार बसला आहे.मोबाईल फुटल्यामुळे जवळपास 20 हजाराचे नुकसान सुद्धा झाले.!प्रतिक्रिया देण्याच्या बहाण्याने बोलावून अशाप्रकारे मारहाण करतील याची पूसटशीही कल्पना गणेश यांना नव्हती. यासंदर्भात गडचांदूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत शरद जोगीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी पत्रकार संघाकडून करण्यात आली आहे.शरद जोगीवर यापुर्वी सुद्धा गुन्हे दाखल असल्याचे कळते? त्याच्या विरोधात कोणी जर बातमी टाकली तर तो,त्याने महिनेवारी पद्धतीने पोसलेल्या काही तथाकथित पत्रकारांना बोलावून आपल्या मनाप्रमाणे उलट बातम्या लावायला सांगतो,हे मात्र विशेष.!

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment