चंद्रपुर :-चंद्रपुर जिल्हातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मा. पोलीस अधिक्षक सा चंद्रपूर यांनी अवैदधरीत्या शस्त्र व अग्गीशस्त्र बाळगनारे गुन्हेगारा विरुध्द कारवाही करन्याचे दिलेल्या निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा यांनी पो.उप नि. अतुल कावळे यांचे पथक तयार करुन, दि. 14/12/2023 रोजी माहीती मिळाली की पोलीस स्टेशन राजुरा हदिदतील गांधी भवन वार्ड, राजुरा येथील अहफाज अली नुरुद्दीन हा इसम वय अंदाजे 25-26 वर्ष हा आपले राहते घरी अवैदधरीत्या तलवार बाळगुन आहे अश्या खबरेवरुन माहिती मिळताच कारवाई करत. आरोपी नामे सय्यद अहफाज अली सय्यद नुरुद्दीन, वय 26 वर्षे, रा. गांधी भवन वार्ड, राजुरा ता. राजुरा जि. चंद्रपुर याला ताब्यात घेवुन त्याचे कडुन दोन लोखंडी तलवारी किं 4,000/- रू व दोन मयान किं. 200/- रू. असा एकुण 4,200/-रू. मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आले.
One accused with two swords in custody of Local Crime Branch, Chandrapur.
आरोपी नामे सय्यद अहफाज अली सय्यद नुरुद्दीन, वय 26 वर्षे, रा. गांधी भवन वार्ड, राजुरा ता. राजुरा जि. चंद्रपुर विरूध्द पोस्टे राजुरा येथे कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोस्टे राजुरा करित आहेत.
सदरची यशस्वी कामगीरी मा. पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पोलीस उप निरीक्षक अतुल विनायक कावळे, पो हवा, मिलींद चव्हाण, अनुप डागे, जमिर पठाण, नितेश महात्में, गणेश मोहुर्ले सर्व स्था.गु.शा. चंद्रपुर यांनी केली.
0 comments:
Post a Comment