Ads

अपघातात 20वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

घुग्घुस:- शहरातील वेकोलिच्या इंदिरा नगर कॉलनी येथील भीम गौशाला रोडच्या बाजूला रात्री अकराच्या सुमारास कारच्या धडकेत स्मित श्याम पगडी वय वीस वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला.A 20-year-old youth died on the spot in the Car accident
काल रात्री अकराच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम.एच.२९ बी.सी. 8276 हा मित्र पंकज देसाई याच्यासोबत बेलोरा येथे जात असताना कारवरील ताबा सुटला आणि झाडावर आदळली.या अपघातात स्मितचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र पंकज जखमी झाला.घटनेची माहिती घुघुस पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा व पुढील तपास केला.

स्मितला वेकोलिमध्ये नोकरी लागल्याने त्याच्या कुटुंबात आणि जवळच्या लोकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र आता अपघातामुळे घुग्घुस मध्ये शोककळा पसरली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment