चंद्रपूर (प्रतिनिधी)-राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती आणि झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर शाखेच्या वतीने कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्य जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. सरकारनगर येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते तर विशेष अतिथी म्हणून सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या एड. पारोमिता गोस्वामी, एड. कल्याण कुमार, जि.प.चे माजी उप कार्यकारी अधिकारी श्रीधर मालेकर याप्रसंगी उपस्थित होते.
Geocentric experiment of AdyalTekadi inspiring village development Ad.Kalyankumar
श्रीतुकारामदादा गीताचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर संकल्प गीत कार्तिक चरडे यांनी सादर केले तर बंडू टेकाम गुरूजी यांनी ' हर देश में तू हर भेष में तू' हे राष्ट्रसंताचे प्रसिद्ध गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रा. श्रावण बानासुरे यांनी केले. त्या काळात शासनाच्या आदर्श गाव योजना संकल्प व प्रकल्प अभियानात गीताचार्य दादांनी दिलेले योगदान अविस्मरणीय होते, असे प्रतिपादन श्रीधर मालेकर यांनी केले . एड. कल्याणकुमार याप्रसंगी म्हणाले, राष्ट्रसंताच्या पावन प्रेरणेने कर्मयोगी श्रीतुकारामदादा यांनी अड्याळ टेकडीवर भूवैकुंठ उभे केले. त्या प्रयोगातून अनेक कार्यकर्ते घडले. श्रीसंत तुकारामदादा गीताचार्याच्या कार्य प्रेरणेतून आम्हाला दारूबंदीच्या अभियानात उर्जा मिळत होती.राष्ट्रसंताच्या परिवर्तनवादी गीतांमुळे महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यास बळ मिळत असे, असे मत एड. पारोमिता गोस्वामी यांनी मांडले. ग्राम.बंडोपंत बोढेकर म्हणाले की, कर्मयोगी श्रीतुकारामदादा हे महान तपस्वी होते. त्यांनी आपल्या आत्मबळाच्या जोरावर समाजमनात ग्रामगीता रूजविण्यासाठी केलेले प्रयत्न अनुकरणीय असल्याचे मत मांडले.
यावेळी झाडीबोली साहित्य मंडळाच्या सदस्य कवयित्री श्रीमती रोहिणी मंगरूळकर, मंजूषा खानेकर, सरिता बेले, छाया टिकले, संगीता मालेकर,कु. गुंजन झाडे , कार्तिका कायरकर आदींनी स्वरचित कवितांचे वाचन केले .
या कार्यक्रमात नशामुक्त भारत अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल श्रीधर मालेकर यांचा व नक्षत्राचं देणं काव्यमंच चे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीमती रोहिणी मंगरूळकर यांचा सत्कार करण्यात आला. साप्ताहिक प्रभातगुंजन च्या वार्षिक साहित्य विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रभावी सूत्रसंचालन डॉ. धर्मा गांवडे यांनी केले तर आभार प्रभाकर आवारी यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
विलासराव उगे , देवराव कोंडेकर,अभय घटे, विजय सिध्दावार , नामदेव गेडकर, उमेश आष्टनकर , विजय चिताडे, खंगार पाटील,साहिल बुलबुले ,डी.टी. नन्नावरे, रजनी बोढेकर , देवराव बोबडे,अभिषेक बुलबुले, सुशिल आडे, राजु टोंगे आदींनी परिश्रम घेतले.
0 comments:
Post a Comment