Ads

प्रशिक्षण संस्थेतून उत्तमोत्तम कलाकार घडतील-आ.प्रतिभा धानोरकर.

तालुका प्रतिनिधी,जावेद शेख भद्रावती:-फारसा सांस्कृतिक वारसा न लाभलेल्या भद्रावती तालुक्यातील मातीत सुप्रसिद्ध गायक, नट तथा नाट्य निर्माते व दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कल्चरल सेंटरची स्थापना करून येथील इच्छुक नवोदित कलाकारांना अभियानाच्या प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या या धाडसी प्रयत्नांना निश्चितपणे मोठे यश प्राप्त होऊन या प्रशिक्षण केंद्रातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तमोत्तम कलावंत घडतील व ते जगाच्या पाठीवर आपले नाव लौकीक करतील असे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले.The best of the best artists will be in the training institution-A. Privabha Dhanorkar.
तालुक्यातील टाकळी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कल्चरल सेंटर या नाट्य प्रशिक्षण संस्थेचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते दिनांक 13 रोज शनिवारला उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या सदर उद्घाटन कार्यक्रमाला आमदार प्रतिभाताई धानोरकर, विरोधी पक्षनेते तथा माजी मंत्री विजय वडेट्टीवार, भारत सरकार सीआरटी चे चेअरमन डॉ. विनोद इंदुरकर, नाट्य विभागाचे माजी संचालक डॉ. निळकंठ कृळसगे, नांदेडचे बापूसाहेब गजभारे, यवतमाळचे इंजि. भास्कर चव्हाण, चंद्रपूरचे डॉ.इसादास भडके, अनिरुद्ध वनकर ,महापौर संगीता अमृतकर, गोपाल अमृतकर, कुशल मेश्राम, सुरेंद्र रायपुरे, खनकेसर, शंकर मून, सरपंच प्रवीण बांदुरकर, अजित फाळके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनिरुद्ध वनकर यांनी मुख्य दिग्दर्शक केलेल्या गोंडवाना महायोद्धा क्रांतिवीर बाबुराव शेडमाके या नाटकाचा विनामूल्य प्रयोग सादर करण्यात आला. अनिरुद्ध वनकर हे धडपडी व्यक्तिमत्व असून नाट्य व गायन क्षेत्रात ते नवनवीन प्रयोग करीत असतात. त्यांचा हा प्रशिक्षण केंद्राचा प्रयोगही यशस्वी होईल व रंगभूमी विश्वात एक नवा ठसा उमटवेल असा विश्वास विरोधी पक्षनेते विजय वडीटीवर यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे संचालन मंगेश मेश्राम, प्रास्ताविक अनिरुद्ध वनकर तर उपस्थिताचे आभार प्रवीण भसारकर यांनी मानलेत. सदर कार्यक्रमाला टाकळी येथील तथा तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment