चंद्रपुर :-मागील काही दिवसापासुन चंद्रपुर शहरात घरफोडीचे प्रमाण वाढल्याने अशा गुन्हयांना आळा घालण्याकरिता पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. या निर्देशानुसार पोलीस निरिक्षक महेश कोंडावार स्थागुशा चंद्रपुर यांनी एक विशेष पथक नेमुन त्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी अनेक दिवसापासुन सापळा रचला दि.१२/०१/२४ रोजी गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोस्टे रेकॉर्डवरील घरफोडीचा गुन्हेगार नामे आशिष श्रीनिवास रेडडीमल्ला वय २४ वर्ष रा. रयत्तवारी कॉलरी, डिस्पेन्सरी चौक, चंद्रपूर यांने यांनी लालपेठ कॉलरी चंद्रपूर येथील घरफोडी करून तो रयत्तवारी कॉलरी ऐरीयात संशायास्पद स्थितीत फिरत आहे.Chandrapur LCB shackles two house burglary accused

वरिल नमुद आरोपी कडुन पोस्टे चंद्रपूर शहर येथे १) अप. कं २८/२४ कलम ४५७, ३८० भादवी तसेच २) अप. कं १६/२४ कलम ४५७, ३८० भादवीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. नमुद आरोपी हा उच्चशिक्षीत असुन त्याचेवर यापुर्वी पोस्टे रामनगर येथे घरफोडीचे गुन्हे दाखल आहे.
सदरची यशस्वी कामगीरी मा. श्री. रविंद्रसिंग परदेशी पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पो. नि. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, पोउपनि विनोद भुरले, पो.हवा. संजय आतकुलवार, नापोअ संतोष येलपुलवार, पो.अ. नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, तसेच सायबर पथक यांनी केली.
0 comments:
Post a Comment